Extortion : नगर : एमआयडीसीतील (MIDC) एका नामांकित कंपनीत पुरवठादाराकडून येणाऱ्या कच्च्या मालाच्या वाहनांना अडवून, वाहनचालकांना दमदाटी व मारहाणीची धमकी देत आर्थिक खंडणीची (Extortion) मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime Filed) करण्यात आला आहे.
नक्की वाचा : वंदे भारत एक्सप्रेस आता नगरच्या स्थानकावर
यांच्याविरूध्द गुन्हा दाखल
आकाश बबन दंडवते व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कंपनीचे एचआर निरंजन नंदकुमार कुलकर्णी (वय ३९, रा. एकविरा चौक, सावेडी) यांनी गुरूवारी (ता. ७) फिर्याद दिली आहे. ही घटना बुधवारी (ता. ६) दुपारी २ वाजेच्या सुमारास, पुणे येथील पुरवठादारांकडून पाठवलेले चार मालवाहू टेम्पो गेट क्र. ३ वर पोहोचले होते.
अवश्य वाचा : आठवीतील विद्यार्थ्यावर वर्गमित्रांकडून चाकू हल्ला!
रोख पैशांची केली मागणी (Extortion)
यावेळी आकाश दंडवते आणि त्याचे तीन साथीदार यांनी संबंधित वाहन चालकांना अडवले. त्यांना शिवीगाळ करत दमदाटी केली आणि टेम्पो कंपनीच्या आत नेण्यासाठी रोख पैशांची मागणी केली. यावेळी कंपनीच्या सेक्युरिटी गार्डने हस्तक्षेप केला असता, त्यालाही धमकी देण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.