Extortion : नगर : कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे (Pratap Darade) यांच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला असून या घटनेने आता वेगळे वळण घेतले आहे. एक कोटीच्या खंडणीसाठी (Extortion) अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असल्याची फिर्याद म्हटले आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी एका महिलेविरुद्ध फिर्याद दिली आहे.
अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड
फिर्यादीत म्हटले आहे की,
पोलीस निरीक्षक दराडे यांच्या नातेवाईकांचे मुंबई येथे हॉटेल आहे. काही कामानिमित्त हॉटेलवर जाणे-येणे होते. त्यावेळी हॉटेलवरील कर्मचाऱ्यासोबत ओळख झाली. त्यावेळी सदर महिलेने माझा नंबर घेतला. दरम्यान २०२३ मध्ये मला फोन करून मी दुबई येथे आली आहे. माझे पैसे संपले आहेत. मला २० हजारांची गरज असल्याबाबत कळविले. तुमचे पैसे मी भारतात आल्यावर देते, असे सांगितले. त्यावेळी मी ऑनलाईन पैसे पाठविले. मात्र, संशयित व्यक्तीची परिस्थितीची माहिती असल्याने पैसे मागितले नाही. त्यानंतर २०२४ मध्ये पुन्हा त्या व्यक्तीने माझ्याकडे कुठलाही जॉब नसल्याने संपर्क करून पुन्हा पैशाची मागणी केली. व मी अहिल्यानगर येथे शिर्डी येथे दर्शनासाठी येत असल्याचे सांगितले. त्यावेळी केडगाव येथे एका हॉटेलमध्ये भेट झाली. त्यावेळी तिने पुन्हा आईने दिलेली सोन्याची अंगठी गहाण टाकली आहे, ती सोडवायची असून ४० हजरांची मागणी केली. त्यावेळी पैसे दिले.
नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…
एक कोटी दे अन्यथा अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी (Extortion)
मात्र, त्यानंतर मी दिलेले उसने पैसे मागितले असता माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. पुन्हा तिने ५० हजारांची मागणी केली. त्यावेळी तू मागचे पैसे दिले नाही, तुला कसे पैसे देऊ. त्यावेळी ती म्हणाली की, मला पैशाची आवश्यकता आहे. ‘आपको पता है, मै हनीट्रॅप भी कर सकती हू. फालतु में लटक जायेंगे, असे म्हणत मला धमकी दिली. त्यानंतर पुन्हा वारंवार पैशाची मागणी करत धमकी दिली. एक कोटी दे वनटाइम सेटलमेंट करू अन्यथा मी अत्याचाराचा गुन्हा दाखल करून तुला हानीट्रॅपमध्ये अडकवेल, अशी धमकी दिली. असे भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात प्रताप दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून महिलेविरुद्ध भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.