Extortion: श्रीगोंदा: शहरातील पारगाव रस्त्यावरील महात्मा फुले उद्यानासमोर व्यवसाय करणाऱ्या एका महिला आयस्क्रीम विक्रेत्यावर ५० हजार रुपयांच्या खंडणीसाठी (Extortion) लोखंडी गजाने आणि लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण (Inhuman beating) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेच्या निषेधार्थ आणि आरोपींवर कडक कारवाईच्या मागणीसाठी मंगळवारी (ता.२४) श्रीगोंदा शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भरवस्तीत खंडणी (Extortion) मागण्याचे धाडस करणाऱ्या गुंडांवर पोलीस काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. संबंधित महिला व्यावसायिक आपल्या नेहमीच्या ठिकाणी आयस्क्रीम विक्रीचा व्यवसाय करत असताना, आरोपींनी त्यांच्याकडे ५० हजार रुपयांच्या खंडणीची मागणी केली. ही मागणी फेटाळल्याने संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला चढवला. या अमानुष मारहाणीमुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे.
अवश्य वाचा- भोंदूबाबा अशोक खरातचे शिर्डी, नगरमध्ये मालमत्तांचे जाळे
श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन (Extortion)
या घटनेनंतर आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि नगर परिषदेच्या जागेत त्यांनी केलेले अतिक्रमण तातडीने जमीनदोस्त करावे किंवा त्यांना अतिक्रमित जागेतून हाकलून देत त्यांचेवर गुन्हे दाखल करावे, या मागणीसाठी व्यापारी आणि नागरिक आक्रमक झाले. मंगळवारी सकाळपासूनच शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून नागरिकांनी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. नगराध्यक्षा सुनीता खेतमाळीस, मुख्याधिकारी पुष्पगंधा भगत, नगरसेविका मीरा शिंदे, चांदणी खेतमाळीस, ॲड. सुशील शिंदे, बाळासाहेब बळे सर, मीरा खेंडके, संतोष खेतमाळीस, सुनीता शिंदे, धनंजय कोथिंबीरे, अरविंद कापसे यांच्यासह मोठ्या संख्येने व्यापारी व नागरिक उपस्थित होते.

नक्की वाचा- शिक्षकांच्या उन्हाळी सुट्ट्यांवर संक्रात? कारण नेमकं काय?
प्रशासनाची आंदोलकांशी चर्चा (Extortion)
आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने आंदोलकांशी चर्चा केली. ७ आणि ८ मार्च रोजी पोलीस बंदोबस्तात नगर परिषदेच्या इमारतीमधील अतिक्रमण काढून घेण्याचे आणि त्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. या आश्वासनानंतर नागरिकांनी तूर्तास आंदोलन मागे घेतले असले, तरी आरोपींवर कठोर कारवाई होईपर्यंत नागरिक लक्ष ठेवून आहेत.



