Makrand Anaspure:मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतर नवरंगी धमाका,‘मूषक आख्यान’चे पोस्टर प्रदर्शित 

0
Makrand Anaspure:मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतर नवरंगी धमाका,‘मूषक आख्यान’चे पोस्टर प्रदर्शित 
Makrand Anaspure:मकरंद अनासपुरेंचा दिवाळीनंतर नवरंगी धमाका,‘मूषक आख्यान’चे पोस्टर प्रदर्शित 

Makrand Anaspure : अभिनेता मकरंद अनासपुरे (Makarand Anaspure) नेहमीच काहीतरी नवीन घेऊन येत असतात.‘राजकारण गेलं मिशीत’ या धमाल चित्रपटानंतर आता ‘मूषक आख्यान’ (Mushak Akhyan) या चित्रपटात ते नऊ ढंगाच्या नऊ वेगवेगळ्या भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहेत. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर या चित्रपटाचा पोस्टर लाँच आणि टीझर (Teaser Out)रिलीजचा सोहळा श्री सिद्धिविनायक मंदिरात पार पडला. 

नक्की वाचा :  प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित

मकरंद अनासपुरे यांनीच ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. मराठीत हा प्रयोग पहिल्यांदाच होतो आहे.‘देशमाने डिजी व्हिजन’द्वारे प्रस्तुत ‘मूषक आख्यान’ या चित्रपटाची निर्मिती सुरेश पठारे, मच्छिंद्र लंके, शिल्पा अनासपुरे, त्रिशला देशमाने यांनी केली आहे. मकरंद अनासपुरे यांच्या नऊ भूमिका अत्यंत सहजपणे कथेत गुंफल्या आहेत. 

‘मूषक आख्यान’मध्ये गौतमी पाटीलची ठसकेबाज लावणी (Makrand Anaspure)

या चित्रपटाचे लेखक हेमंत एदलाबादकर आहेत. छाया दिग्दर्शन सुरेश देशमाने यांचे आहे. हर्षदा पोरे कल्लुरकर यांनी लिहिलेल्या गीतांना अतुल दिवे यांनी संगीतबद्ध केले आहे. गायिका वैशाली सामंत यांच्या आवाजातील गाणी खूपच श्रवणीय झाली आहेत. सुप्रसिद्ध लावणी नृत्यांगना गौतमी पाटील हिची ठसकेबाज लावणी हे ‘मूषक आख्यान’ चित्रपटाचे विशेष आकर्षण असणार आहे

अवश्य वाचा : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी,राज्य सरकारचा मोठा निर्णय

चित्रपटात ‘हे’ कलाकार दिसणार (Makrand Anaspure)

संकलन अनंत कामत तर पार्श्वसंगीत अभिजित हेगडे यांचे आहे. व्हीएफएक्स अरविंद हतनुरकर तर साउंड डिझाईनची जबाबदारी मयूर वैद्य यांनी सांभाळली आहे. ‘मूषक आख्यान’ चित्रपटात मकरंद अनासपुरे हे मुख्य भूमिकेत आहेत. तर गौतमी पाटील देखील या चित्रपटाचे आकर्षण ठरणार आहे. तसेच या चित्रपटात भरत सावले, प्रकाश भागवत, नितीन कुलकर्णी, राजू सोनावणे, अमर सोनावणे, स्वाती देशमुख, रुचिरा जाधव यांच्या लक्षणीय भूमिका आहेत. पोस्ट प्रॉडक्शन रश मिडिया, अन्वय उत्तम नायकोडी, रंगभूषा- कुंदन दिवेकर, वेशभूषा- माधुरी मोरे यांचे आहे. या चित्रपटात अर्कचित्रांचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला आहे आणि ही अर्कचित्रे नागपूरचे व्यंगचित्रकार उमेश चारोळे यांनी केली आहेत. ‘मूषक आख्यान’ हा चित्रपट ८ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here