Fake Aadhaar Card : व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देणारे दोघे जेरबंद 

Fake Aadhaar Card : व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देणारे दोघे जेरबंद 

0
Fake Aadhaar Card : व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देणारे दोघे जेरबंद
Fake Aadhaar Card : व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी देणारे दोघे जेरबंद

Fake Aadhaar Card : नगर : बनावट आधारकार्डचा (Fake Aadhaar Card) वापर करून खरेदी केलेल्या सिमकार्डद्वारे शहरातील व्यापाऱ्यास जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देऊन खंडणी मागणारे दोघे स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने भिंगार येथून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

नक्की वाचा : ‘राम शिंदे ‘सर’असल्याने त्यांना क्लास चालवण्याची सवय’- देवेंद्र फडणवीस

८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

अजय अरुण साळवे, पवन प्रमोद उघडे ( दोघे रा. भिंगार), अशी ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत किरण मोहनलाल राका यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटले आहे की, फिर्यादी हे सर्जेपुरा येथून घेरी जात असताना अज्ञात व्यक्तीने फिर्यादीस आडवून भाई का फोन आएगा उठालो असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार तसेच सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या घटनेतील आरोपी भिंगार येथे असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले.

अवश्य वाचा : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा

बनावट आधारकार्डच्या आधारे कागदपत्रे तयार (Fake Aadhaar Card)

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता दिपक राजु भुजबळ, (रा.घासगल्ली, कोठला, अहिल्यानगर) याचे  विजय अरूण नवगिरे, रा.कल्याण रोड, शिवाजीनगर या नावाने बनावट कागदपत्राच्या आधारकार्ड तयार केले. त्या बनावट आधारकार्डच्या आधारे वेगवेगळी कागदपत्रे तयार केली. आरोपी अजय साळवे याने व्यापारी किरण राका यांचेकडून खंडणी वसुल करण्याचे उद्देशाने बनावट कागदपत्रावरून नवीन सिमकार्ड घेतले. आरोपी पवन प्रमादे उघडे याचेसह दुचाकीवर जाऊन फिर्यादीस आडवून धमकावले व नंतर त्यांचेकडील मोबाईलद्वारे फिर्यादीस यांना खंडणी मागण्याकरीता धमकी दिल्याचे तपासत समोर आले आहे. त्याच्याकडून ८२ हजार रुपायांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. संशयित आरोपीना तोफखाना पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई तुषार धाकराव, पोलीस अंमलदार संदीप पवार, संतोष खैरे, सागर ससाणे, रविंद्र घुंगासे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व महादेव भांड यांच्या पथकाने केली.