Fake Accident : अपघाताचा बनाव करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Fake Accident : अपघाताचा बनाव करणाऱ्याचा जामीन फेटाळला

0
Fake Accident : अपघाताचा बनाव करणाऱ्याचा जामीन फेटाळला
Fake Accident : अपघाताचा बनाव करणाऱ्याचा जामीन फेटाळला

Fake Accident : नगर : पूर्व वैमनस्यातून जीपच्या सहाय्याने धडक देऊन अपघाताचा बनाव (Fake Accident) केलेला आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे (रा. पावन गणपतीसमोर, नेवासे) याचा अटकपूर्व जामीन (Pre-Arrest Bail) जिल्हा व सत्र न्यायाधीश (District and Sessions Judge) हरिभाऊ वाघमारे यांनी फेटाळला आहे.

नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत गणित,विज्ञानात उत्तीर्ण होण्यासाठी ‘इतके’ गुण आवश्यक

खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

शंतनू पोपट वाघ (रा. नेवासे) हे त्यांच्या स्टोन क्रशरकडे खडका फाटा येथे दुताकीवरून ता.१६ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १० वाजता जात होते. आरोपी ज्ञानदेव उर्फ नारायण सूर्यभान लष्करे (रा. पावन गणपतीसमोर, नेवासे) याने पूर्व वैमनस्यातून जीपने मार्केट यार्ड, नेवासे येथून पाठलाग करुन छत्रपती संभाजीनगर महामार्गावर घाडगे पाटील शाळेजवळ धडक देऊन खुनाचा प्रयत्न केला. वाघ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अवश्य वाचा : राज्यात आम्हीच सत्ता स्थापन करणार आहोत : आमदार बच्चू कडू

नियमित जामीनसाठी न्यायालयात केला होता अर्ज (Fake Accident)

आरोपी लष्करे याने नियमित जामीन मिळण्यासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला होता. मूळ फिर्यादीतर्फे ॲड. सतीशचंद्र सुद्रिक तर सरकारतर्फे ॲड. व्ही. के. भोर्डे यांनी युक्तीवाद केला. अहिल्यानगर-छत्रपती संभाजीनगर हा राज्य महामार्ग चौपदरी आहे. ज्या ठिकाणी धडक दिली, ती जागा घाट किंवा धोकादायक नाही. आरोपीने पूर्वनियोजत कट करून खुनाचा प्रयत्न केलेला आहे. न्यायालयाने दोन्ही बाजुचे म्हणणे ऐकून आरोपी लष्करेचा नियमित जामीन अर्ज फेटाळला.