Fake Accident : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी काझी शिवारात पिकअप व दुचाकीचा अपघात (Accident) झाला होता. मात्र तो अपघात नसून प्रेम संबंधातून तरुणाचा खून असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. अपघाताचा बनाव (Fake Accident) करणाऱ्या दोघांना पोलिसांनी (Police) ताब्यात बेड्या ठोकल्या असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
नक्की वाचा : ‘मुलीच्या बापाने हुंड्याचे पैसे जावयाला व्यवसायासाठी द्यावेत’; मनोज जरांगेंचं वक्तव्य
३० मे रोजी घडली होती घटना
विश्वजित सुभाष पोटे (वय.२५), संकेत बाळासाहेब बंडाले (वय २७, दोघे रा. दादेगाव) असे अटक केलेल्या संशयित दोघांची नावे आहेत. तर आदेश नंदू घोरपडे (वय २२, रा. कायनेटिक चौक, अहिल्यानगर) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना ३० मे रोजी सायंकाळी टाकळी काझी (ता. अहिल्यानगर) शिवारातील एका हॉटेल समोर घडली.
अवश्य वाचा : ‘त्याच्या बॉडीच पोस्टमार्टम करु नका’;चेंगराचेंगरीत एकुलता एक मुलगा गमावलेल्या पित्याचा टाहो
पिकअपने दिली होती जोरदार धडक (Fake Accident)
आदेश नंदू घोरपडे व त्याचा मित्र मोहित संतोष निमसे (वय २०, रा. रंगोली चौक, केडगाव) दुचाकीवरून नगरच्या दिशेने येत असताना समोरून आलेल्या पिकअपने जोरदार धडक दिली. त्यात घोरपडे याचा मृत्यू झाला होता. मोहित निमसे याने याप्रकरणी २ जून रोजी तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात पिकअप चालकाविरूध्द अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मृत घोरपडेच्या आईने हा अपघात नसून तिच्या मुलाचा खून झाल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला होता. त्यामुळे पोलिसांनी तपासाची दिशा बदलून अधिक सखोल चौकशी केली असता, ही हत्या असल्याचे निष्पन्न झाले.