Fake Arms License : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Fake Arms License : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

0
Fake Arms License : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश
Fake Arms License : काश्मीरमधील बनावट शस्त्र परवाना देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश

Fake Arms License : नगर : अवैध शस्त्रांचा (Illegal Arms)बनावट शस्त्र परवाना (Fake Arms License) देणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करून नऊ जणांकडून १२ बोअर, नऊ रायफल व ५८ काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत. या आरोपींना अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा सोनई तसेच पुणे येथून ताब्यात घेतले आहे. जेरबंद नऊ आरोपी जम्मू काश्मीर (Jammu and Kashmir) मधील असून ते अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात विविध ठिकाणी राहत होते.

नक्की वाचा : झाशीमध्ये मृत्यूतांडव! रुग्णालयाच्या आगीत १० नवजात अर्भकांचा मृत्यू

असे आहेत ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे

ही कारवाई तोफखाना पोलीस व दक्षिण कमांड मिलिटरी एजन्सी पुणे यांनी संयुक्त पथकाने केली. शब्बीर मोहम्मद इक्बाल हुसैन गुज्जर (वय ३८, रा. दलोरी, ता.जि. राजौरी, राज्य जम्मू कश्मीर), मोहम्मद सलीम गुल मोहम्मद (वय ३२, रा. लहा, ता. थानामंडी, जि. राजौरी, राज्य जम्मू कश्मीर), मोहम्मद सफराज नजीर हुसैन (वय २४, रा. कोठीयन ता. कलाकोठ, जि. राजौरी, राज्य जम्मू काश्मीर), जहांगीर झाकीर हुसैन (वय २८, रा. डांगरी, ता. जि. राजौरी, राज्य जम्मू कश्मीर), शाहबाज अहमद नजीर हुसैन (वय ३३, रा. कोठीयान, ता. कलाकोठ, जि. राजौरी, राज्य जम्मू काश्मीर), सुरजित रमेशचंद्र सिंग (रा. सियालसुई, ता. कालकोठ, जि. राजौरी, राज्य जम्मू कश्मीर), अब्दुल रशिद चिडीया (वय ३८, रा. सोम, ता. कालाकोट जि. राजौरी, राज्य जम्मू काश्मीर), तुफेल अहमद मोहम्मद गाजीया (रा. मोघला, ता. कालाकोट जि. राजौरी, राज्य जम्मू काश्मीर), शेर अहमद गुलाम हुसैन (रा. जम्मू काश्मीर) असे ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा : शेतकरी व नागरिकांनी आमदारांच्या फोटोला दुग्धाभिषक करत केले अनोखे स्वागत

१२ बोअर, ९ रायफल, ५८ काडतूस हस्तगत (Fake Arms License)

आरोपी हे जम्मू व काश्मीर राज्यातील काही व्यक्तींच्या खोट्या कागदपत्राच्या आधारे अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, पुणे येथे सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत.  त्यांच्या जवळ असलेले हत्यार व परवाने हे बनावट असल्याची खात्रीशीर माहिती तोफखाना पोलिस व दक्षिण कमांड मिलिटरी एजन्सी पुणे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपाधीक्षक अमोल भारती व तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे व दक्षिण कमांड मिलिटरी एजन्सी यांच्या पथकाने मिळालेल्या माहितीनुसार जम्मू व काश्मीर येथील राजौरी येथील जिल्हाधिकारी यांना पत्र व्यवहार करून परवाना बाबत खात्री केली असता हे बनावट परवाने बनवत असल्याचे आढळून आले. त्यानुसार पथाने अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, पुणे येथे छापा टाकून आरोपी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ बोअर, ९ रायफल, ५८ काडतूस असा मुद्देमाल हस्तगत केला.