Fake Call Center : बनावट कॉल सेंटरचे अहिल्यानगर कनेक्शन; वरिष्ठ पोलीस अधिकारी रडारवर!

0
Fake Call Center : बनावट कॉल सेंटरचे अहिल्यानगर कनेक्शन; वरिष्ठ पोलीस अधिकारी रडारवर!
Fake Call Center : बनावट कॉल सेंटरचे अहिल्यानगर कनेक्शन; वरिष्ठ पोलीस अधिकारी रडारवर!

Fake Call Center : नगर : सीबीआयच्या पथकाने (CBI Team) नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बनावट कॉल सेंटरवर (Fake Call Center) छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत पकडलेल्या संशयित आरोपींकडून (Suspected Accused) झालेल्या चौकशीत अहिल्यानगरचे कनेक्शन समोर आले आहे.

नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर   

परदेशातील लोकांना विविध आमिषे दाखवून आर्थिक गंडा

अहिल्यानगर शहर व परिसरात काही ठिकाणी अशाच प्रकारचे कॉल सेंटर सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणात जिल्ह्यातील काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे नावे चर्चेत असल्याची माहिती समोर येत आहे. बनावट कॉल सेंटरव्दारे परदेशातील लोकांना विविध आमिषे दाखवून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गंडा घालण्यात आला होता. नाशिकसह इतर ठिकाणांहून यूएसए, कॅनडा, ब्रिटन आदी देशांतील नागरिकांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करण्यात आली होती. सायबर यंत्रणेने डिजिटल ट्रॅकिंग च्या माध्यमातून आयपी ॲड्रेस शोधून सरकारला अहवाल पाठवल्यानंतर सीबीआयने ठिकठिकाणी छापेमारी मोहीम सुरू केली.

अवश्य वाचा:  “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार   

काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण पाठबळ (Fake Call Center)

इगतपुरी येथील छाप्यात मुंबईतील पाच जणांना अटक झाली होती. त्यापैकी दोन जण मीरा-भाईंदर येथील असून, त्यांनी रायगड आणि पालघर जिल्ह्यांतही अशाच पध्दतीने कॉल सेंटर चालविल्याची कबुली दिली. त्यानंतर अहिल्यानगर कनेक्शन समोर आले असून सीबीआय त्यादृष्टीने तपास करत आहे. दरम्यान, हे कॉल सेंटर नाशिकसह ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई आणि अहिल्यानगर येथे सुरू असताना त्यामागे काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण पाठबळ असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.