Fake Currency Notes : ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोघे ताब्यात; तालुका पोलिसांची कारवाई

Fake currency notes : ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोघे ताब्यात; तालुका पोलिसांची कारवाई

0
Fake currency notes : ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोघे ताब्यात; तालुका पोलिसांची कारवाई
Fake currency notes : ५०० रुपयांच्या बनावट नोटांसह दोघे ताब्यात; तालुका पोलिसांची कारवाई

Fake Currency Notes : नगर : भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या १६० बनावट नोटा (Fake currency notes) छापून त्या चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघा संशयितांनां नगर तालुका पोलिसांच्या (Nagar Taluka Police Station) पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून बनावट नोटासहा ८० हजार रुपये असा सुमारे १७ लाख ३७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. नगर-सोलापूर महामार्गावर रुईछत्तीसी गावच्या शिवारात रविवारी (ता.२७) रात्री १० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.

नक्की वाचा : किरण काळे प्रकरणाचा सखोल तपास व्हावा; खासदार नीलेश लंके यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

संशयित आरोपींची नावे

सोमनाथ माणिक शिंदे (वय २५, रा. तपोवन रोड, नगर) व निखील शिवाजी गांगर्डे (वय २७, रा. कोंभळी, ता. कर्जत), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अवश्य वाचा : सुपा पोलीस ठाण्याच्या प्रभारीपदी ज्योती गडकरी; दिवटे यांची नियंत्रण कक्षात तडकाफडकी बदली

रुईछत्तीसी गावच्या शिवारात कारवाई (Fake Currency Notes)

नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते यांना मिळालेल्या माहितीनुसार रुईछत्तीसी परिसरात दोन व्यक्ती एका चारचाकी वाहनातून भारतीय चलनातील ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेवून त्या खऱ्या असल्याचे भासवून व्यवहार करण्यासाठी येत आहेत, अशी खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार रात्री गस्त पथकाला बोलावून घेत पथकासोबत ते रुईछत्तीसी गावच्या शिवारात सापळा रचून कारवाई केली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.