Fake Insurance : आधी कांदा आता फळबागांचा देखील उतरविला बोगस विमा 

Fake Insurance : आधी कांदा आता फळबागांचा देखील उतरविला बोगस विमा 

0
Fake Insurance : आधी कांदा आता फळबागांचा देखील उतरविला बोगस विमा 
Fake Insurance : आधी कांदा आता फळबागांचा देखील उतरविला बोगस विमा 

Fake Insurance : नगर : हवामान बदलांमुळे (Climate Change) शेतीवर विपरीत परिणाम होत असून त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. परिणामी दिवसेंदिवस शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती खालावत होती. हे टाळण्यासाठी सरकारकडून ठोस पावले उचलत अवघ्या १ रुपयात पीक विमा (Crop Insurance) योजना राबवण्यात सुरुवात केली. या योजनेत शेतकऱ्यांना अवघा १ रुपया भरावा लागत होता तर उर्वरित रक्कम सरकार जमा करत आहे. तसेच विमा उतरवण्यात आलेल्या पिकांची पाहणी केली जात नसल्याने अनेकजण बोगस विमा (Fake Insurance) उतरविल्याचे असल्याचे समोर आले आहे.

फळबागा क्षेत्रावर बोगस विमा उतरविल्याचे समोर

कृषी विभागाने जिल्ह्यात कांदा पिकाचा बोगस विमा उतरविण्यात आला असल्याचा प्रकार उघड केला असतानाच आता परत फळबाग नसतानाही २ हजार ५५ ठिकाणी फळबागा क्षेत्रावर बोगस विमा उतरविल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळ पिक विमा योजना शासन निर्णय ता. १२ जून २०२४ नुसार मृग व आंबिया बहार सन २०२४ – २५ व २०२५ – २६ या वर्षाकरिता राज्यात राबविण्यात येत आहे. मृग बहार २०२४ मध्ये राज्यात एकुण ७३ हजार ७७७ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला असुन ५० हजार ४४३.८६ हे विमा क्षेत्र संरक्षित केलेले आहे. यामध्ये अहिल्यानगर जिल्हयात १३ हजार ८५ अर्जदारांनी सहभाग नोंदविला असुन ७ हजार ५१५.२४ क्षेत्र विमा संरक्षित केलेले आहे. 

शेतकऱ्यांच्या फळबागांची तपासणी करण्याच्या सूचना (Fake Insurance)

मात्र कांद्याच्या बाबतीत आलेला अनुभव पाहता प्रधानसचिव (कृषि) यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे आढावा बैठक पार पडली. या बैठकीत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेत मागील तीन वर्षामध्ये आढळुन आलेल्या बोगस अर्जाची संख्या पहाता मृग बहार २०२४ मधील सर्व सहभागी अर्जाची १०० टक्के क्षेत्रिय तपासणी करुन घेण्याचे निर्देश दिलेले आहेत. कृषी आयुक्तालयाने सर्व जिल्हयांना मृग बहार २०२४ मधील क्षेत्रीय तपासणी करण्याबाबत सुचना दिलेल्या होत्या. त्यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी जिल्ह्यातील सर्व तालुक्‍यात जात मृग बहार सन २०२४ मधील सहभागी शेतकऱ्यांच्या फळबागांची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्ह्यात २ हजार ५५ ठिकाणी फळबागा नसताना देखील विमा उतरविल्याचे समोर आले आहे.