Shirdi News:शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये पुन्हा बनावट पास विक्री,गुन्हा दाखल

0
Shirdi News:शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये पुन्हा बनावट पास विक्री,गुन्हा दाखल
Shirdi News:शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये पुन्हा बनावट पास विक्री,गुन्हा दाखल

Shirdi News : जगप्रसिद्ध देवस्थान असलेल्या शिर्डीत (Shirdi Sai Baba Mandir) दररोज हजारो भाविक साई बाबांच्या दर्शनासाठी येत असतात. तर अनेक जण शिर्डीत पेड दर्शन (Paid Darshan) घेतात. मात्र या दर्शन पासमध्ये फसवणूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कंत्राटी कर्मचाऱ्याने बनावट दर्शन पास (Fake Pass)विक्री केल्याचे उघड झाले असून या कर्मचाऱ्याविरोधात आता गुन्हा दाखल (Case registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज

सागर आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल (Shirdi News)

शिर्डी साईबाबा देवस्थानमध्ये बनावट पास विक्रीचा प्रकार उघड झाला आहे. प्रकाशन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यानेच बनावट दर्शन पास बनवले. साई संस्थानच्या चार नंबर प्रवेशद्वारावर संस्थान सुरक्षा कर्मचाऱ्याला संशय येताच आरोपी कर्मचाऱ्याने पास फाडल्याने त्याचं बिंग फुटलं. साई संस्थानचे संरक्षण अधिकारी रोहिदास माळी यांच्या फिर्यादीवरून मुंबईच्या बेटर कम्युनिकेशन लिमिटेड कंपनीचा कंत्राटी डीटीपी ऑपरेटर सागर रमेश आव्हाड याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट पास विक्रीचा प्रकरण हा अनेक दिवसांपासून सुरू असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

अवश्य वाचा : मराठी सिनेमांना थियटर मिळत नसल्यानं तेजश्री प्रधाननं व्यक्त केली खंत!  

शिर्डीत येणाऱ्या भाविकांना पेड दर्शनपास देऊन फसवणूक झाल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. हे प्रकार घडत असल्याने साईबाबा मंदिर संस्थानने महत्त्वपूर्ण निर्णय घेत पेड दर्शनपास व आरती पाससाठी ओळखपत्र अनिवार्य केले करण्यात आले होते. यामुळे जो साईभक्त पेड दर्शन पास घेईल किंवा ज्याला आरती करायची आहे, त्याच्याच नावाने ओळखपत्राची एन्ट्री करून पास देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील बनावट पास तयार करण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

 ३१ डिसेंबरच्या रात्री साई मंदिर भाविकांसाठी खुले (Shirdi News)

२०२४ या सरत्या वर्षाला निरोप आणि २०२५या नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत लाखो भाविक येतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदा ३१ डिसेंबर रोजी रात्री साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती साई संस्थानने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here