Farmer : श्रीरामपूर : तालुक्यातील नऊ गावांच्या अकारी पडीत जमिनीचे प्रश्न शासनाने (Government) अद्यापही न सोडवल्यामुळे संघर्ष समितीने श्रीरामपूर प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारात आंदोलनकर्ते शेतकऱ्यांसह (Farmer) उपोषण सुरू केले आहे. शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अॅड. अजित काळे यांच्या नेतृत्वाखाली उंदीरगाव, खानापूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, ब्राह्मणगाव वेताळ, वडाळा महादेवचे शेतकरी उपोषणाला (Hunger Strike) बसले आहेत.
नक्की वाचा : लाेकसभा निवडणुका डाेळ्यासमाेर ठेवून ईडीकडून जाणून बुजून कारवाई; शरद पवार यांची टीका
शासन हक्काच्या जमिनी सोडत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण
दोनशे ते अडीचशे आकारी पडीत शेतकरी उपोषणासाठी सकाळी दहा वाजेपासून ते पाच वाजेपर्यंत उपोषणस्थळी बसून होते. उपोषणकर्त्या शेतकऱ्यांनी जोपर्यंत शासन हक्काच्या जमिनी सोडत नाही, तोपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा सरकारला दिलेला आहे. याबाबत न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करणे साठी सांगितलेले आहे. परंतु गेल्या सहा महिन्यापासून महाराष्ट्र शासनाने प्रतिज्ञापत्रही सादर केलेले नाही. साहजिकच सरकारचा महसूल विभाग न्यायालयात माहिती देण्यासही असमर्थ ठरत असून शेतकऱ्यांच्या जमिनी परत देण्याचा निर्णय घेण्यास असमर्थता दर्शवत असल्याच्या निषेधार्थ उंदीरगाव, खानापूर, माळवाडगाव, मुठेवाडगाव, ब्राह्मणगाव वेताळ, वडाळा महादेवच्या शेतकऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयात आमरण उपोषण सुरू केले आहे.
हे देखील वाचा : नीलेश लंके म्हणाले, अजून काही ठरलं नाही
आंदोलनात सहभाग (Farmer)
या आंदोलनात बबनराव नाईक, शिवाजी आढाव, गोविंद वाघ, अशोक दुधेडिया, शिवाजी पवार, राजेंद्र कासार, शालनताई झुरळे, बाळासाहेब असणे, सुनील असणे, रावसाहेब आढाव, बाळासाहेब कासार, अनिल असणे, बापूसाहेब गलांडे, अशोक गुळवे, बाबासाहेब आसने, बबनराव वेताळ, सतीश नाईक, रावसाहेब नाईक, हरिभाऊ बांद्रे, नानासाहेब गुळवे यांच्यासह अनेक शेतकरी सहभागी झाले होते.