Farmer : जिल्ह्यात हरभरा पिक हमीभावाने खरेदीसाठी १० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी

जिल्ह्यात हरभरा पिक हमीभावाने खरेदीसाठी १० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी

0
Farmer : जिल्ह्यात हरभरा पिक हमीभावाने खरेदीसाठी १० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी
Farmer : जिल्ह्यात हरभरा पिक हमीभावाने खरेदीसाठी १० केंद्रांवर ऑनलाइन नोंदणी

Farmer : नगर : शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सहकारी पणन महासंघ, मुंबई (Mumbai) यांच्या वतीने जिल्ह्यात चना/हरभरा हमीभावाने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात एकूण १० खरेदी केंद्रांना मंजुरी देण्यात आली असून संबंधित केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने शेतकरी (Farmer) नोंदणी १ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत करण्यात येणार आहे. हंगाम २०२४-२५ करीता चना हमीभाव प्रति क्विंटल ५ हजार ८७५ रुपये निश्चित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा मार्केटींग अधिकारी बी.आर. पाटील यांनी दिली आहे.

हेही वाचा : महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाच्या उपाध्यक्षपदी अविनाश घुले यांची निवडपुण्यातील राज्य कार्यकारिणी बैठकीत घोषणा

हरभरा खरेदीसाठी १० केंद्रावर नोंदणी

हरभरा खरेदीसाठी जिल्ह्यातील खालील १० केंद्रावर नोंदणी करण्यात येत आहे. यामध्ये शेवगाव तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, शेवगाव, जय भगवान स्वयंरोजगार सहकारी संस्था, पाथर्डी (मार्केट यार्ड, पाथर्डी), श्रीदत्त पणन सहकारी संस्था, श्रीगोंदा (घारगाव), रियल अॅग्रो फार्म प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (घुटेवाडी), जय किसान फार्मर प्रोड्युसर कंपनी, श्रीगोंदा (मांडवगण), राहुरी तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, राहुरी, पारनेर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ, पारनेर, बहारदारबाद विविध कार्यकारी सोसायटी, कोपरगाव (रांजणगाव देशमुख), चैतन्य कानिफनाथ कृषी फळे प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (खर्डा) व पुण्यश्लोक कृषी पणन प्रक्रिया सहकारी संस्था, जामखेड (पिंपरखेड)

हे पहा : खामेनेईंच्या मृत्यूवर रडणारे शहीद सैनिकांसाठी रस्त्यावर का येत नाहीत : आमदार संग्राम जगताप

ही कागदपत्रे लागणार (Farmer)

सर्व खरेदी प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार असून नोंदणीसाठी आधारकार्डची छायांकित प्रत, राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची प्रत (खाते क्रमांक हस्तलिखित नसलेला), चालू वर्षाचा ७/१२ व ८-अ उतारा, तूर पिकाची ऑनलाइन नोंद आणि चालू मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. शेतकऱ्यांनी चालू हंगामातील सर्वसाधारण सरासरी दर्जा (FAQ) दर्जाचा चना खरेदी केंद्रावर आणावा. एनसी.सी.एफ यांनी निर्धारित केलेल्या निर्देशानुसार चन्याची तपासणी करण्यात येणार आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्यांना एसएमएसद्वारे खरेदीसाठी बोलाविण्यात येईल. एसएमएसमध्ये नमूद केलेल्या तारखेलाच शेतमाल केंद्रावर आणणे बंधनकारक राहील, असेही कळविण्यात आले आहे.