Farmer did last rituals of Bull : बैलाविषयी कृतज्ञता जपत पार पडला बैलाचा दशक्रिया विधी

Farmer did last rituals of Bull : बैलाविषयी कृतज्ञता जपत पार पडला बैलाचा दशक्रिया विधी

0
Farmer did last rituals of Bull : बैलाविषयी कृतज्ञता जपत पार पडला बैलाचा दशक्रिया विधी
Farmer did last rituals of Bull : बैलाविषयी कृतज्ञता जपत पार पडला बैलाचा दशक्रिया विधी

Farmer did last rituals of Bull : राहुरी: तांभेरे येथील शेतकरी बापूसाहेब आनंदा मुसमाडे यांचा धिंगाण्या नावाचा म्हातारा बैल (Bull) अनंतात विलीन झाला. बैलाप्रती असणारी कृतज्ञता जपत मुसमाडे कुटुंबियांनी जेसीबीच्या (JCB) साह्याने खड्डा खणून साश्रुनयनांनी बैलाला मूठमाती दिली. जीवापाड जपलेल्या बैलाचा आज दशक्रिया विधी केला (Farmer did last rituals of Bull). तो त्यांच्या कुटुंबातील एक सदस्यच होता.

अवश्य वाचा: अहिल्यानगरमध्ये पाच उमेदवार बिनविरोध नगरसेवक; भाजपचे तीन तर राष्ट्रवादीचे दोन

धिंगान्या आनंदाने काम करत

वीस वर्षांपूर्वी वावरथ जांभळी येथून एका शेतकऱी मित्राकडून दोन दात केलेला खोंड मुसमाडे यांनी विकत आणला होता. धिंगाण्या असे त्याचे नामकरण करुन त्याला चांगला खुराक खायला देत बाळसेदार बनवले. शेतीकामाची सवय लावली. मुसमाडे यांची बैलांना हाकण्याची हातोटी व धिंगाण्या बैलाचे गुण एकरुप झाले. केवळ चाबकाच्या घुंगरांच्या तालावर चालणाऱ्या, मातीत धिंगाणा घालणाऱ्या धिंगाण्याने आपल्या धन्याच्या हृदयात स्थान प्रस्थापित केले. मालकीच्या शेती मशागती समवेत बाहेरच्या कामाचे दोन पैसे आपल्या धन्याला मिळवून देऊ लागला. काम करणे हा बैलाचा धर्मच आहे, परंतु तेच काम धिंगान्या आनंदाने करत असल्याने मालकाचा त्याच्यावर जीव जडला. तब्बल अठरा वर्षे धिंगान्या मातीत राबला. वयोवृद्ध झालेला हा बैल २६ डिसेंबर २०२५ रोजी काळाच्या पडद्याआड विलीन झाला.

नक्की वाचा : विखे–जगताप एक्स्प्रेस सुसाट; पाच नगरसेवक बिनविरोध

ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित (Farmer did last rituals of Bull)

माजी सैनिक ताराचंद गागरे व सामाजिक कार्यकर्ते सुनील गागरे यांच्या उपस्थितीत जेसीबीच्या साह्याने खड्डा खणून साश्रुनयनांनी बैलाला मूठमाती दिली. आज रविवारी धिंगाण्या बैलाचा दशक्रियाविधी मनोहर महाराज सिनारे यांच्या प्रवचन सेवेने झाला. ‘मुक्या प्राण्यांवर दया करा’, हा संदेश देत बैलाचे शेतकऱ्याच्या जीवनातील महत्त्व त्यांनी प्रवचनातून विषद केले. यावेळी गावातील व पंचक्रोशीतील अनेक बैल जोडी धारक शेतकरी, गावचे भजनी मंडळ, सात्रळ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिरार्थी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदीबैल महादेवाचे वाहन असल्याने महादेवाच्या आवडत्या पानांचा वृक्ष बेलाचे रोपण यावेळी करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनील सोपान गागरे यांनी श्रद्धांजलीपर बोलताना तर प्रा. मच्छिंद्र निमसे यांनी कवितेच्या माध्यमातून बैलाविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या. माजी सैनिक ताराचंद गागरे यांनी सूत्रसंचालन केले.