Farmer Suicide : २५ लाखांची फसवणूक; फायनान्स कंपनीच्या एंजटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Farmer Suicide : २५ लाखांची फसवणूक; फायनान्स कंपनीच्या एंजटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

0
Fraud : २५ लाखांची फसवणूक; फायनान्स कंपनीच्या एंजटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा
Fraud : २५ लाखांची फसवणूक; फायनान्स कंपनीच्या एंजटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा

Farmer Suicide : नगर : एका फायनान्सकडून लिलावातील वाहन खरेदी करण्यासाठी २५ लाख रूपये दिल्यानंतरही वाहन न मिळाल्याने व पैसेही परत न मिळाल्यामुळे फसवणूक (Fraud) झालेल्या एका शेतकऱ्याने मानसिक तणावात येऊन विषारी औषध (Poison) सेवन करून आत्महत्या (Farmer Suicide) केल्याची घटना वडगाव गुप्ता (ता. अहिल्यानगर) येथे घडली आहे. सोपान जगन्नाथ गिते (रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

अवश्य वाचा : अमेरिकन टेक कंपन्यांना ट्रम्प यांचा स्पष्ट इशारा; आता भारत आणि चीनसारख्या देशांमधून होणार नाही भरती

एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

ही घटना मंगळवारी (ता. ८) घडली होती. याबाबत मयत सोपान गिते यांच्या पत्नी मिनाबाई सोपान गिते (वय ६० रा. धुमाळ वस्ती, वडगाव गुप्ता) यांनी शनिवारी (ता. २६) एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एका फायनान्स च्या रिकव्हरी एजंटसह तिघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नक्की वाचा : पाथर्डीत जुगार अड्ड्यावर विशेष पोलीस पथकाचा छापा; ११ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

ना वाहन मिळाले ना पैसे परत मिळाले (Farmer Suicide)

फायनान्सचा रिकव्हरी एंजट योगेश मोहन कापसे (रा. बाराबाभळी, ता. अहिल्यानगर), एन. के. भुजबळ (पत्ता माहिती नाही) व पवन रमेश भालेराव (रा. चेतना कॉलनी, एमआयडीसी, अहिल्यानगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. सोपान गिते यांनी लिलावातील वाहन खरेदी करण्यासाठी एका फायनान्सशी संबंधीत तिघांकडे २५ लाख रूपये दिले होते. मात्र, संबंधित फायनान्स कंपनीकडून ना वाहन मिळाले ना पैसे परत मिळाले. त्यातून सुरू झालेल्या मानसिक तणावामुळे आणि संशयित आरोपींच्या धमक्यांमुळे शेवटी त्यांनी ८ जुलै रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास विषारी औषध सेवन करून जीवन संपवले. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी करीत आहेत.