Farmers : शेतकऱ्याने लाडक्या ‘नंद्या’ बैलाचा केला दशक्रिया विधी

Farmers : शेतकऱ्याने लाडक्या 'नंद्या' बैलाचा केला दशक्रिया विधी

0
Farmers : शेतकऱ्याने लाडक्या 'नंद्या' बैलाचा केला दशक्रिया विधी
Farmers : शेतकऱ्याने लाडक्या 'नंद्या' बैलाचा केला दशक्रिया विधी

Farmers : अकोले : शेतीसाठी भक्कम साथ देणाऱ्या नंद्याच्या कष्टातून उतराई होण्यासाठी त्याच्या मृत्यूनंतर (Death) पारंपरिक पद्धतीने अंत्यविधी केला. नंतर दहा दिवसांचे सुतक पाळून एका सत्तर वर्षाच्या शेतकऱ्याने (Farmers) नंद्या बैलाचा दशक्रिया विधीही केल्याची घटना शिदवड (ता.अकोले) येथे घडली.

नक्की वाचा : स्वारगेट अत्याचार प्रकरण;आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या गणवेशातील फोटो आला समोर

नंद्या बैल तब्बल 27 वर्षे सांभाळला

शिदवड येथील आदिवासी शेतकरी किसन रामभाऊ गिऱ्हे यांनी अतिशय गरिबीतून आपला प्रपंच केला. पाच मुले, दोन मुली असे त्यांचे कुटुंब आहे. त्यांनी घरच्या गायगोठ्यातील नंद्या बैल तब्बल 27 वर्षे सांभाळला.

अवश्य वाचा : भारत-न्युझीलँड यांच्यात होणार अंतिम सामना; दक्षिण आफ्रिकेचा दारुण पराभव

घरातील सर्वच लहान मोठ्यांचा नंद्या हा लडका बैल (Farmers)

गावरान गाईपासून नंद्याचा जन्म झाला. लहानपणापासून त्याचे पालनपोषण करत त्याच्याकडून नांगरट करून घेतले. घरातील सर्वच लहान मोठ्यांचा नंद्या हा लाडका बैल होता. त्याच्या चारा पाण्यापासून सर्वच त्याची काळजी घेत.

कुटुंबाची भरभराट नंद्यापासून झाल्याने या शेतकऱ्याने त्याला कधी बाजारचा रस्ता कधी दाखवला नाही. 27 व्या वर्षी त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा अंत्यविधी पारंपरिक पद्धतीने केला आणि दहा दिवसांनी दशक्रिया विधीचा कार्यक्रम पार पाडला. लिंगदेव येथील बैरागी या पुरोहिताने त्याचा दशक्रिया विधी केला.

घरातील सर्वांनीच त्याचे दहा दिवसाचे सुतक पाळले. दहाव्या दिवशी विश्वनाथ महाराज शेटे यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी ‘धर्मनिती पशुपक्षी पालना, भूतदया पशुचे पालन, तान्हेल्या जीवना माझी’ या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचे निरूपण केले आणि प्राणी, पशुपक्ष्यांवर दया करा असे आवाहन केले. याप्रसंगी पिंपळगाव खांड सोसायटीचे अध्यक्ष आत्माराम शेटे, दशरथ शेटे, ज्ञानेश्वर ढगे, शरद ढगे, बाळासाहेब ढगे आणि परिसरातील दोनशेपेक्षा अधिक ग्रामस्थ उपस्थित होते. शेवटी दशक्रिया विधी निमित्ताने भोजन दिले.