Farmers Association : श्रीरामपूर : अशोक सहकारी साखर कारखान्याचे (Ashok Sahakari Sakhar Karkhana Ltd.) गेल्या तीन महिन्यापासून उसाचे पेमेंट शेतकऱ्यांना केलेले नाही. त्याचबरोबर कामगारांनाही सहा महिन्यापासून पगार मिळालेले नसल्याने शेतकरी संघटनेचे (Farmers Association) तालुका अध्यक्ष युवराज जगताप यांच्या शिष्टमंडळाने अशोक कारखान्याचे कार्यकारी संचालक देवकर यांचा हार, श्रीफळ व शाल देऊन सत्कार करत गांधीगिरी (Gandhigiri) आंदोलन केले. तसेच 31 मार्चपूर्वी शेतकऱ्यांचे व कामगारांचे सर्व देणे देण्यात यावे, याबाबतचे निवेदनही त्यांना देण्यात आले.
नक्की वाचा: विखेंना विरोध करणाऱ्या भुतारेंची मनसेतून हकालपट्टी
संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले (Farmers Association)
जिल्ह्यातील बहुतांश सहकारी साखर कारखान्यांनी नाबार्डचे निकष डावलून मनमानी पद्धतीने सहकाराच्या नावाखाली जिल्हा बँकेकडून बेकायदेशीर कर्ज घेतले आहे. जिल्हा बँकेने सदर कर्जाची वसुली करण्याचे धोरण घेतल्याने याचा फटका कारखान्याला ऊस घातलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. उसाची देणे कारखाने देऊ शकत नाही. सदर बाब दुर्दैवी आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांची सहकाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक व पिळवणूक होत आहे. याबाबतची गंभीर स्वरूपात दखल घेणे राज्य शासनाकडून अपेक्षित असतानाही सहकारी साखर कारखान्यांवर नियंत्रण असलेले साखर आयुक्त तसेच रीजनल डायरेक्टर यांच्याकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नाही.
हे देखील वाचा: पाथर्डी तालुक्यात बनावट नोटांचा सुळसुळाट
कर्जाच्या वसुलीस स्थगिती दिली असतानाही वसुली (Farmers Association)
जिल्ह्यातील ज्यांच्या ताब्यात कारखाने आहेत त्यांच्याच अधिपत्याखाली जिल्हा बँकेचे कामकाज चालत आहे .यावर्षी राज्य शासनाने दुष्काळी परिस्थितीमुळे दुष्काळ घोषित करून शेतीशी निगडित कर्जाच्या सक्तीच्या वसुली स्थगिती दिली असतानाही जिल्हा बँकेने सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सदर वसुली केली. 31 मार्च पूर्वी शेतकऱ्यांना बाजारपेठेतील कृषी सेवा केंद्र, किराणा दुकान, औषधी दुकान, कापड दुकान, शेती साहित्य आदी शेतीमालाच्या उत्पादनाच्या आधारावर उधारीवर आणले असताना उधारीवर आणलेली देणे कशी द्यायची, असाही प्रश्न निर्माण झाला आहे. 31 मार्चपूर्वी अशोकसह जिल्ह्यातील ज्या कारखान्यांची ऊस बिले व कामगारांचे पगार थकले आहेत अशा कारखान्यांनी 31 मार्च पूर्वी देणे तातडीने देण्यात यावे, अन्यथा जिल्हा शेतकरी संघटना याबाबत एक मोठे जनआंदोलन उभे करणार आहे,असे अनिल औताडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. या शिष्टमंडळात शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुका अध्यक्ष युवराज जगताप, डॉ. दादासाहेब आदिक, साहेबराव चोरमल, डॉ. विकास नवले, इंद्रवान चोरमळ, अकबर शेख, शरद असणे, बबनराव उघडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अवश्य वाचा : ‘त्यांनी’ हिंदुत्त्वाचे विचार बाजूला ठेवून दिले; श्रीकांत शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका