नगर: शेतकऱ्यांना दिलासा देत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला (Farmers Loan) एक वर्षे स्थगिती (One year suspension) देण्यात आली आहे. पूर परिस्थितीमुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नक्की वाचा: न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी घेतली सरन्यायाधीश पदाची शपथ
शेतकरी कर्ज वसुलीला स्थगिती (Farmers Loan)

जून ते सप्टेंबरमध्ये राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचं पुरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आता त्यांच्याकडून करण्यात येणाऱ्या कर्जाच्या वसुलीला देखील स्थगिती देण्यात आली आहे. त्याचसोबत सहकारी कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेशही राज्य सरकारने दिले आहेत. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार (Farmers Loan)
मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. त्यामध्ये घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली, तसेच पशुधनाचेही नुकसान झालं. अशा स्थितीत या शेतकऱ्यांकडून काही ठिकाणी बँकांनी कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याच्या तक्रारी येत होत्या. त्यामुळे राज्य सरकारने आता आदेश काढून कर्ज वसुलीला स्थगिती दिली आहे. प्रहारचे नेते आणि माजी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली त्यासाठी एक आंदोलनही झालं. त्यानंतर राज्य सरकारने पुढच्या ३० जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे.



