Soybean purchase : राज्यात सोयाबीनची खरेदी वेगाने चालू आहे. ३१ जानेवारी नंतर सोयाबीनची खरेदी (Soyabean Purchase) पुढे काही दिवस चालू रहावी,अशी राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मागणी होती. त्या अनुषंगाने सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ (Extention)मिळावी,यासाठी केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाला आम्ही प्रस्ताव पाठवला होता. तो प्रस्ताव केंद्रीय कृषिमंत्र्यांनी मान्य केला असून सोयाबीन खरेदीला ६ फेब्रुवारीपर्यंत (6th february) मुदतवाढ दिली आहे,अशी माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल (Marketing Minister Jayakumar Rawal) यांनी दिली.
नक्की वाचा : “मराठी माणूस कलहशील”;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
मंत्री परेश रावल म्हणाले की… (Soybean purchase)
मंत्री परेश रावल म्हणाले की, राज्यात ३१ जानेवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदत देण्यात आली असल्याने आज ती मुदत संपली होती. सोयाबीन खरेदीची मुदत वाढावी,अशी राज्यातील लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांची मागणी होती. ही मागणी लक्षात घेता यासाठी आमचा प्रत्यक्ष पाठपुरावा सुरू होता.आज ती मुदतवाढ मिळाली.या मुदतवाढीमुळे राज्याला दिलेल्या १४ लाख १३ हजार २६९ मेट्रिक टन पी पी एस खरेदी उद्दिष्ट पूर्ण करता येणार असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अवश्य वाचा : ‘धनंजय मुंडे गुन्हेगार नाही,मी त्यांच्या पाठीशी’-नामदेव शास्त्री
केंद्र सरकारकडून ६ फेब्रुवारीपर्यंत सोयाबीन खरेदीची मुदतवाढ (Soybean purchase)
राज्यात नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून ५६२ खरेदी केंद्रावर ३० जानेवारीपर्यंत ४ लाख ३७ हजार ४९५ शेतकऱ्यांकडून ९ लाख ४२ हजार ३९७ मेट्रिक टनापेक्षा अधिक सोयाबीनची खरेदी झाली आहे. दि.६ फेब्रुवारीपर्यंत या आकड्यात मोठी वाढ होऊन समाधानकारक खरेदी होणार आहे. अनेक जिल्ह्यांनी आपले उद्दिष्टे पूर्ण केले आहे. काही जिल्ह्यांना उद्दिष्टे वाढवून दिली आहेत. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन राज्य सरकारच्या मागणीनुसार केंद्र सरकारने ६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे मंत्री रावल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान आणि केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.