Farmers Protest : शेतकऱ्यांचं आंदोलन 2.0 उद्या दिल्लीत धडकणार

Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सीमेवरच आंदोलकांना रोखण्याची तयारी सुरू आहे.

0
Farmers Protest
Farmers Protest

Farmers Protest नगर : देशातील शेतकरी पुन्हा दुसरे किसान आंदोलन (Kisan Movement) २.० साठी सज्ज झाले आहेत. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसह अनेक राज्यांमधून शेतकरी दिल्लीला जाण्याच्या तयारीत आहेत. या आंदोलनाला ‘चलो दिल्ली मार्च’ (Chalo Delhi March) असे नाव देण्यात आले आहे. मात्र, या आंदोलनात संयुक्त किसान मोर्चाचा समावेश नाही. काही शेतकरी संघटनांचे हे निदर्शन आहे. मात्र तरीही शेतकऱ्यांची तयारी लक्षात घेता पोलिस आणि प्रशासन कोणताही धोका पत्करणार नाही.

नक्की वाचा : माझ्यासोबत घातपाताचा प्रकार,अंगावर गाडी घालण्याचाही प्रयत्न : मनोज जरांगे  

हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेशच्या सीमेवर सतर्कता वाढवली (Farmers Protest)

दिल्ली शहराला लागून असलेल्या हरियाणा,पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या सीमेवर सतर्कता वाढवण्यात आली आहे. काटेरी तारा आणि सिमेंट बॅरिकेड्सने सीमा झाकली जात आहे. शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ईशान्य दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. सीमेवरच आंदोलकांना रोखण्याची तयारी सुरू आहे. उत्तराखंड आणि मध्य प्रदेशातील शेतकरीही दिल्लीला पोहोचू शकतील असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान म्हणाले की, त्यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यास आणि बैठक घेण्यास सांगितले आहे.

अवश्य वाचा : इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा

दिल्लीला लागून असलेल्या सर्व सीमांवर कडक सुरक्षा (Farmers Protest)

दिल्लीतील गाझीपूर टिकरी आणि सिंधू बॉर्डर येथेही दिल्ली पोलिस मोठी तयारी करत आहेत. जेणेकरून शेतकऱ्यांना दिल्लीत प्रवेश करण्यापासून रोखता येईल. गाझीपूर सीमेवर पोलिसांची वाहने आणि बॅरिकेड्स उभारण्यात आले आहेत. सीसीटीव्ही आणि लाऊडस्पीकर लावण्यात येत आहेत. पश्चिम उत्तर प्रदेशातील इतर संघटनाही त्यात सामील होण्याची भीती पोलीस-प्रशासनाला आहे. असे झाल्यास दिल्ली-मेरठ महामार्गही विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.  

हेही पहा : शाहिद कपूरच्या चित्रपटात स्नेहल शिदमला मिळाली संधी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here