FASTag : फास्टॅगमुळे चोरीच्या वाहनाचा लागला शोध

FASTag : फास्टॅगमुळे चोरीच्या वाहनाचा लागला शोध

0
FASTag : फास्टॅगमुळे चोरीच्या वाहनाचा लागला शोध
FASTag : फास्टॅगमुळे चोरीच्या वाहनाचा लागला शोध

FASTag : पाथर्डी : फास्टॅगमुळे (FASTag) पोलिसांना (Police) चोरीच्या वाहनाचा शोध लागण्यास मदत झाली आहे. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील उमेश झुंबरलाल नहार ह्या व्यापाऱ्याची चारचाकी वाहन चोरी (Theft) गेली होती.

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय  

याबाबत माहिती अशी की,

नहार यांच्या मालकीचे वाहन गुरुवारी (ता. २६) चालक हा त्याच्या नातेवाईकाकडे घेऊन गेला होता. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर येथून भेंडाळा फाटा ते गंगापूर रस्त्याने येत असताना वाहन चालक गोकुळ भुंजा (रा.गंगापूर) हा चहा घेण्यासाठी खाली उतरला. त्यानंतर रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास थोड्या अंतरावर चालक गेला. त्याचाच फायदा घेऊन अनोळखी व्यक्तीने चारचाकी वाहन व वाहनात असलेला चालकाचा मोबाईल फोन घेवुन पळून गेला.

अवश्य वाचा : “मुख्यमंत्री साहेब,आरोपींना पाठीशी घालू नका,अन्यथा तुम्हाला पश्चात्ताप होईल”- मनोज जरांगे

टोलनाक्यावर फास्टॅग वरचे पैसे कट झाल्याचा मेसेज (FASTag)

वाहन चालकाने अनोळखी चालकाचा पाठलाग केला. मात्र, तो भेंडाळा फाटा येथुन छत्रपती संभाजीनगरकडे पळुन गेला. वाहनाला लावलेल्या फास्टॅग मध्ये पैसे नसल्याने मालकाने शक्कल लढवत त्यामध्ये पुरेसे पैसे टाकले. नंतर शनिवारी (ता. २८) आरोपी चोरीचे वाहन घेऊन पाथर्डी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील बडेवाडीच्या टोलनाक्यावर आला. टोलनाक्यावर वाहनावरील फास्टॅग वरचे पैसे कट झाले. त्याचा मेसेज वाहन मालकालाच्या मोबाईलवर आला. त्यानंतर लगेच ही माहिती गंगापूर पोलिसांना दिली. पोलिसांनी अहिल्यानगर पोलिसांशी संपर्क साधून याची कल्पना दिली. बडेवाडीचा टोल नाका पास करतात पाथर्डी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरिष भोये यांनी पोलीस पथकाला रवाना केले. पोलीस पथक हे पाथर्डी शहरातील पोळा मारुती जवळ चोरीचे वाहन अडवण्यासाठी सापळा लावून थांबले होते. मात्र स्कार्पिओ चालक आरोपी याने पोलिसांना हुलकावणी देत भरधाव वेगाने वाहन पाथर्डी शहराच्या दिशेने आणून पाथर्डी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात वाहन घातले. त्यानंतर अल्ताफ शेख, संजय जाधव,अरुण निळे, निलेश गुंड या पोलीस कर्मचाऱ्यांनी या चोरीच्या वाहनाचा पाठलाग करून या वाहन चालक असलेला आरोपी संतोष ओंकार गायकवाड (रा. तलवाडा ता. गेवराई जि.बीड)याला ताब्यात घेतले. त्यावेळी पोलिसांची व या आरोपीची झटापट झाली. गंगापूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक की के थोरे, पोलीस कॉन्स्टेबल आर एस वडमारे यांच्या ताब्यात पाथर्डी पोलिसांनी चोरीचे वाहन व आरोपीला दिले.


चोरीची गाडी घेऊन आरोपी पाथर्डी वरून जात असताना आरोपीने पाथर्डी पोलीस ठाण्याच्या पोलिस  पथकाला पाहताच गाडीचा वेग वाढवत पोलिसांना हुलकावणी देत भरधाव वेगाने गाडी पाथर्डीच्या दिशेने सुसाट पळवली. मात्र या दरम्यान कोणताही अनुचित प्रकार झाला नाही. पोलिसांनीही या स्कार्पिओ गाडीचा पाठलाग करून एका आरोपीसह स्कॉर्पिओ गाडी पाथर्डी पोलिसांनी ताब्यात घेतली. या गाडीमध्ये अन्य दोन प्रवासी होते.त्यांनी हि गाडी भाड्याने केली होती. ते ही स्कॉर्पिओ गाडी घेऊन चालले होते. आरोपी आणि पोलीस यांच्यातील झालेल्या घटनाक्रमात सुदैवाने  कोणतेही अपघाताची घटना घडला नाही.