Fastag Annual Pass : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी १५ ऑगस्ट २०२५ पासून उपलब्ध होणाऱ्या नवीन फास्टॅग (New Fastag) आधारित वार्षिक पासची घोषणा केली आहे. ३ हजार रुपयांच्या या पासची किंमत टोल पेमेंट सुलभ करण्यासाठी आणि कार, जीप आणि व्हॅन सारख्या खाजगी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी सहज प्रवास करण्यास अनुमती देण्यासाठी आहे. मात्र त्याच्या वापरावर काही मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत.
नक्की वाचा : आयसीसीकडून क्रिकेटच्या ६ नियमांमध्ये मोठा बदल;वाचा सवीस्तर…
फक्त NHAI महामार्गावरच असणार वैध (Fastag Annual Pass)
या नवीन फास्टॅग पासची सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तो केवळ भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) द्वारे संचालित महामार्ग आणि द्रुतगती मार्गांवरच वैध असेल. राज्य सरकारच्या अखत्यारीतील मार्गांवर तो स्वीकारला जाणार नाही, ज्यामुळे त्याची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात मर्यादित झाली आहे. महाराष्ट्रामध्ये, हा पास ८७ टोल प्लाझापैकी केवळ १८ टोल प्लाझावरच वैध असेल. समृद्धी महामार्ग, अटल सेतू किंवा इतर राज्य महामार्ग आणि टोल रस्त्यांसारख्या प्रमुख राज्य-संचालित द्रुतगती मार्गांवर तो स्वीकारला जाणार नाही. यामुळे, हा पास राज्यातील अनेक नागरिकांसाठी फारसा उपयुक्त ठरणार नाही,अशी टीका होत आहे.
अवश्य वाचा : वीज ग्राहकांसाठी आनंदाची बातमी! पाचही वर्षात वीजदर कमी होणार;मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
पासच्या अटी आणि मर्यादा (Fastag Annual Pass)
या पाससोबत काही अटी देखील आहेत. फास्टॅग खात्यात किमान २०० रुपये नेहमी शिल्लक असणे आवश्यक आहे आणि ३ हजारांची रक्कम ही न मिळणारी आहे. जर वापरकर्त्याने NHAI मार्गांवर पुरेशा प्रमाणात प्रवास केला नाही, तर पासमधील गुंतवणूक वाया जाऊ शकते.
हा पास वाहनाच्या सध्याच्या RFID-आधारित FASTag शी जोडला जाईल आणि जेव्हा वाहन पात्र NHAI टोल प्लाझाच्या ६० किमीच्या आत येईल, तेव्हा तो आपोआप सक्रिय होईल. हा पास हस्तांतरणीय नाही. ज्या वाहनांचे फास्टॅग केवळ त्यांच्या चेसिस क्रमांकावर नोंदणीकृत आहेत, ती वाहने या पाससाठी पात्र नसतील.