Fatal attack : नगर तालुका : जामखेड येथे एका मुकादमावर पूर्व वैमनस्यातून रविवारी (ता. ३) जीवघेणा हल्ला (Fatal attack) करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने आज जेरबंद केले. अक्षय विश्वनाथ मोरे (वय २०, रा. पाटोदा, ता. जामखेड) व कुणाल जया पवार (वय २२, रा. कान्होपात्रा नगर, ता. जामखेड) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.
हे देखील वाचा: पोलिस भरतीसाठी आजपासून करता येणार ऑनलाइन अर्ज
विरोधात गुन्हा केल्याच्या रागातून गोळीवर (Fatal attack)
आबेद पठाण हे लेबर मुकादम आहेत. त्यांच्याकडील मजूर लक्ष्मण कल्याण काळे (रा. जामखेड, जि. नगर) याला अक्षय मोरे याने दीड वर्षांपूर्वी मारहाण केल्याने त्याचे विरुध्द जामखेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्याचा राग मनात धरुन आरोपी अक्षय मोरे याने त्याचे साथीदारासह येवून आबेद पठाण यांना शिवीगाळ करुन, पिस्टलने गोळी झाडून पठाण यांना जखमी केले होते. याबाबत जामखेड जीवघेणा हल्ला व अवैध शस्त्र बाळगण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नक्की वाचा: शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज; ८ हजार मेगावॅट वीजनिर्मिती निश्चित
आरोपींकडून गावठी कट्टा व दुचाकी हस्तगत (Fatal attack)
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे दिला होता. त्यानुसार पथकाने उपलब्ध सीसीटीव्ही फुटेज व परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली. मिळालेल्या माहितीनुसार विंचरणा नदी पात्रा जवळील काटवनातून आरोपी कुणाल पवारला ताब्यात घेतले. त्याच्याकडे अक्षय मोरे याच्या बाबत माहिती घेतली. पथकाने अक्षय मोरेला जामखेड तालुक्यातील वाकी येथून ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडून गावठी कट्टा व दुचाकी हस्तगत केली तसेच आरोपींना पुढील तपासासाठी जामखेड पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.