Fathima Beevi Died : सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचे निधन

सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं आहे.

0
सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीशांचे निधन

नगर : सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (Fatima Beevi) यांचं वयाच्या ९६ व्या वर्षी निधन झालं आहे. केरळमधील एका खासगी रुग्णालयात त्यांचे निधन झाले आहे.फातिमा बीवी यांनी तमिळनाडूच्या राज्यपाल म्हणून देखील काम केलं आहे. केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी फातिमा बीवी यांच्या निधनावर शोक व्यक्त केला.

नक्की वाचा : महाराष्ट्रात आजपासून अवकाळी पावसाची शक्यता

फातिमा बीवी यांनी प्रतिकूल परिस्थितीत इच्छाशक्तीच्या जोरावर मोठं यश मिळवले आहे. फातिमा यांनी केरळमधून वकीलीच्या माध्यमातून करिअर सुरू केले होते. त्यानंतर १९८३ साली त्या सर्वोच्च न्यायालयात पहिल्या महिला जज झाल्या. देशातील उच्च न्यायालयात नियुक्त झालेल्या त्या पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश होत्या. एवढं नव्हे तर आशिया खंडातील कोणत्याही देशाच्या सर्वोच्च न्यायालयात महिला न्यायाधीश होणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या होत्या. त्यांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या सदस्य म्हणून काम केले होते. १९९० साली त्यांना डी.लिट आणि महिला शिरोमणी अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते.

हेही वाचा : देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा

२५ जानेवारी १९९७ मध्ये तमिळनाडूच्या राज्यपालपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली. भारतात ज्या काळात पुरुषप्रधान संस्कृतीचा वचक होता. त्या काळात फातिमा यांनी न्यायाधीश होण्याचं स्वप्न पाहिलं होते. जे त्यांनी पूर्ण देखील केलं. राज्याच्या राज्यपाल म्हणून त्यांनी मद्रास विद्यापीठाच्या कुलगुरुपदाचा भर देखील सांभाळला होता.  त्याचबरोबर त्यांनी केरळ मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्ष आणि  राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या  सदस्य म्हणूनही काम केले होते.त्यांच्या जाण्याने मात्र सर्व क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here