Female ST bus Conductor Assaulted : नगर : अहिल्यानगर शहरातील माळीवाडा बसस्थानक (Maliwada Bus Stand) परिसरात कर्तव्यावर असलेल्या एका महिला एसटी वाहकासोबत हुज्जत घालून त्यांना मारहाण केल्याची (Female ST bus Conductor Assaulted) घटना समोर आली आहे. यप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा बुधवारी (ता.२८) दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा: महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘दादा’ पर्व संपलं; कशी होती अजित दादांची राजकीय कारकीर्द ?
वाहकासोबत विनाकारण घातला वाद
फिर्यादी या पाथर्डी आगाराच्या बसवर महिला वाहक म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (ता.२८) सायंकाळी माळीवाडा बसस्थानकाबाहेर बस थांबलेली असताना, संशयित आरोपी मीना भीमराव धायकर (रा. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर) हिने बस थांबवून फिर्यादी महिला वाहकासोबत विनाकारण वाद घातला. वादाचे रूपांतर पुढे धक्काबुक्कीत झाले.
शासकीय कामात अडथळा (Female ST bus Conductor Assaulted)
आरोपीने महिला वाहकाला मारहाण व शिवीगाळ करत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या घटनेनंतर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या करत आहेत.



