Fertilizers : श्रीरामपूर: श्रीरामपूर व राहुरी विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा (Fertilizers) तुटवडा निर्माण झाला असून खतांची मोठ्या प्रमाणावर मागणी आहे, परंतु काही ठिकाणी युरिया व रासायनिक खतांचा तुटवडा असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी आमदार हेमंत ओगले (MLA Hemant Ogle) यांच्याकडे केल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार ओगले यांनी तातडीने मुंबई येथे कृषीमंत्री (Agriculture Minister) नामदार माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. यावेळी त्यांच्या समवेत माजी नगराध्यक्ष संजय फंड, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे, मर्चंटचे संचालक निलेश नागले उपस्थित होते.
अवश्य वाचा : कुकडी-घोड प्रकल्पातून चार आवर्तन सोडण्याचा निर्णय : मंत्री विखे
पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांपुढे अडचणी
आमदार ओगले यांनी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना निदर्शनास आणून दिले की श्रीरामपूर-राहुरी विधानसभा मतदारसंघात युरिया व इतर रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या तालुक्यात 32 हजार 890 इतके क्षेत्र लागवडीखाली असून त्यामध्ये खरिपाचे गहू व हरभरा तसेच कांद्याची मोठ्या प्रमाणावर लागवड झाली असून त्यासाठी शेतकऱ्यांना युरिया व इतर रासायनिक खतांची मोठी मागणी होत आहे. परंतु मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
नक्की वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?
खतांचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना (Fertilizers)
यावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी ताबडतोब या विषयाची दखल घेऊन लगेचच भ्रमणध्वरीद्वारे कृषी विभागाचे सहसंचालक काटकर तसेच जिल्हाकृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांना श्रीरामपूर मतदारसंघात होणाऱ्या युरिया व रासायनिक खतांचा पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती आमदार ओगले यांनी दिली. तरी याबाबत मतदारसंघातील शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन देखील आमदार हेमंत ओगले यांनी केले आहे.