Fight : संगमनेर : तालुक्यातील जोर्वे येथील आठ तरुणांना शहरातील जोर्वेनाका परिसरातील एका गटाने बॅटने मारहाण (Fight) केल्याने पुन्हा एकदा जोर्वे नाका परिसर (Jorve Naka area) चर्चेत आला आहे. ही घटना गुरुवारी (ता.२१) पहाटे एक वाजेच्या दरम्यान घडली. त्यामुळे संगमनेर शहराची कायदा सुव्यवस्थेचा (law and order) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
नक्की वाचा : शिर्डीत दिवसाढवळ्या गोळीबार; आरोपी फरार
रागाने पाहिल्याने वाद (Fight)
याबाबत सविस्तर माहिती अशी की, जोर्वे गावातील क्रिश संतोष पगार, कृष्णा सतिष क्षिरसागर, अदित्य पोपट घुले, दिपक सोपान घुले, साईनाथ राजेंद्र गायकवाड, राहुल राजू पगारे, गणेश गोविंद जोर्वेकर हे बुधवारी (ता.२०) नांदुर शिंगोटे येथे नाईट क्रिकेट मॅचेस खेळण्यासाठी गेले होते. मॅच संपल्यानंतर हे सर्व तरुण रात्री १ वाजता मोटरसायकलवर घराकडे निघाले. रात्री २ वाजण्याच्या सुमारास ते तरुण शहरातील जोर्वे नाक्याकडे जात असताना दोन तरुण दुचाकीहून आले आणि त्यांनी या तरुणांकडे रागाने पाहिल्याने यांचा काहीतरी हेतू आहे हे लक्षात आले. तेव्हा या दोघांतील एकाने कोणाला तरी फोन लावला.
हे देखील वाचा : भगव्या ध्वजाचा आचारसंहितेशी संबंध काय?; ‘शिवप्रतिष्ठान’च्या धारकऱ्यांचा सवाल
गाडी आडवी लावून शिवीगाळ व मारहाण (Fight)
जोर्वे नाक्यावर गेल्यानंतर या दोघांनी आठ जणांना गाडी आडवी लावली. शिविगाळ दमदाटी करण्यास सुरूवात केली. तर, गाडीहून उतरुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी तेथे एकच आरडाओरड झाली आणि त्या क्षणी घटनास्थळी आणखी सात ते आठजण आले. त्यांनी देखील शिविगाळ करीत मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपींपैकी एकाने आदित्य घुले याच्या हातातील बॅट हिसकून घेतली आणि बॅटने मारहाण केली. बाकी लोकांनी देखील धक्काबुक्की करीत शिविगाळ, दमदाटी करुन मारहाण केली. त्यानंतर तेथे अन्य काही लोक जमा झाले आणि त्यांनी सोडवासोडव करुन या आठ जणांना पोलीस ठाण्यापर्यंत नेवून सोडले. त्यानंतर या आठ जणांनी संगमनेर शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे.
दरम्यान, आठ दिवसांपूर्वीच कोल्हेवाडी रस्त्यावर कोल्हेवाडीच्या व्यक्तीला एका समाजाकडून मारहाण झाली होती. या प्रकाराने संगमनेर तालुक्याचे वातावरण तणावाखाली असतानाच आता पुन्हा जोर्वे नाक्यावर हा प्रकार घडल्याने संताप व्यक्त होत आहे.