संगमनेर: गेल्या काही दिवसांपासून संगमनेरमध्ये दोन गटात या ना त्या कारणांवरून हमरीतुमरी नंतर त्याचे पर्यावसान हाणामाऱ्यांवर (Fight) व पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल होत आहेत. शहरात सामाजिक अशांततेची एक सुप्त लाट तयार होत असून वेळीच हे सामाजिक तेढ (Social bias) मिटून शहरात शांतता, सलोखा व बंधुभाव निर्माण व्हावा, यासाठी पोलीस प्रशासनाने गुरुवारी (ता.२१) सायंकाळी ६ वाजता प्रांत कार्यालयाच्या बैठक (Meeting) सभागृहात शांतता कमिटीची बैठक आयोजित केली होती. परंतु तेथील दोन गटातील खडाजंगी (Fight) व हमरीतुमरीने एकंदरीतच त्या शांतता कमिटीच्या बैठकीत फक्त अशांतताच पहायला मिळाली. जोरदार झालेल्या खडाजंगीत पोलीस (Police) अधिकाऱ्यांनीही काढता पाय घेतला. त्यामुळे या शांतता बैठकीचे रूपांतर अशांततेत बदललेले पाहायला मिळाले.
हे देखील वाचा: नगर जिल्ह्यात पाच पेक्षा जास्त जणांना एकत्र येण्यास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधात्मक आदेश लागू
जोरदार खडाजंगी (Fight)
या बैठकीमध्ये दोन गटाचे प्रतिष्ठित व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते व संघटनांचे प्रतिनिधी बोलविण्यात आले होते. या ठिकाणी इतिहासात घडून गेलेल्या घटनांचे दाखले देत एकाच बाजूने रीळ ओढण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून झाल्याने दुसऱ्या गट कमालीचा नाराज होऊन त्यांनी एकमुखी निर्णय घेत सभागृहाचा त्याग केला. विविध मुद्यांवरून दोन गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार खडाजंगी यावेळी पहायला मिळाली. जो तो आमचेच ऐका आम्हीच कसे बरोबर असल्याच्या आविर्भावात बोलत होते.
नक्की वाचा: ‘या’ निवडणुका न घेतल्याने एक प्रकारे लाेकशाहीची हत्या; शिवसेनेच्या नेत्याचा घणाघात
पोलिसांची मध्यस्थी (Fight)
एक वेळ अशी आली की, दोन समाजातील कार्यकर्ते एकमेकांना भिडायला (Fight) लागले होते. मात्र, वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने एक गट सभागृहातून बाहेर गेला. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला. दरम्यान, संगमनेर शहरातील जोर्वेनाका परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री जमावाने काही विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. या घटनेनंतर पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी गुरुवारी सायंकाळी प्रांत कार्यालयाच्या बैठक सभागृहात शांतता समितीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे व शहराचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीसाठी दोन्ही गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते. एकंदरीत शांतता कमिटीच्या बैठकीचे काहीही फलित निघाले नसल्याचेच समोर आले. मात्र, काही समाजकंटकांमुळे गावचे वातावरण बिघडत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित होत असून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, यासाठी त्या समाजकंटकांचा वेळीच बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे.