Filed a Case : नगर : पारनेर तालुक्यातील राळेगणसिध्दी (Ralegansiddhi) येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात चार चोरट्यांनी एटीएम फोडून १९ लाख ६२ हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. ही घटना ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत पारनेर पोलीस ठाण्यात (Parner Police Station) गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील
१९ लाख ६२ हजारांची चाेरी
याबाबत बँकेचे शाखा व्यवस्थापक किरण नारायण आवारी (वय ३३, रा. रांधे, ता. पारनेर) यांनी पारनेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. राळेगणसिद्धी गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून त्या बाहेरच एटीएम मशीन आहे. ५ नोव्हेंबर रोजी पहाटे ३ च्या सुमारास एका चारचाकी कारमधून चार चोरटे बँक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएम जवळ आले. त्यांनी गॅस कटरने एटीएम फोडून त्यातील चार पैकी दोन बॉक्समधील १९ लाख ६२ हजार रुपये एवढी रक्कम लांबविली.
नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला
पोलिस येण्यापूर्वीच चोरट्यांनी पळ काढला (Filed a Case)
या घटनेबाबत पारनेर पोलिसांना फोन करून माहिती दिली. ही माहिती मिळताच रात्रगस्त घालणारे पोलीस उपनिरीक्षक चांगदेव हंडाळ व पोलिसांचे पथक राळेगण सिद्धी कडे रवाना झाले. मात्र, पोलिसांना घटनास्थळी येण्यापूर्वीच चोरट्यांनी पळ काढला आहे. या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक हंडाळ हे करत आहेत.



