Filed a Case : ‘मुंबईत बॉम्बस्फोट होणार’ अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Filed a Case : 'मुंबईत बॉम्बस्फोट होणार' अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

0
Filed a Case : 'मुंबईत बॉम्बस्फोट होणार' अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल
Filed a Case : 'मुंबईत बॉम्बस्फोट होणार' अशी खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या पारनेरच्या तरुणावर गुन्हा दाखल

Filed a Case : पारनेर : “मुंबईत बॉम्बस्फोट (Bombsfot) होणार आणि शहराचा नाश होणार, असा खोटा कॉल करून पोलीस प्रशासनाची धावपळ उडवणाऱ्या एका तरुणाला पारनेर पोलिसांनी (Parner Police) बेड्या ठोकल्या आहेत. मयुर लक्ष्मण साळवे (वय ३०, रा. हिवरे कोरडा, ता. पारनेर) असे या आरोपीचे नाव असून, त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Filed a Case) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : राहाता तालुक्यात अवकाळी पावसाने शेतीचे नुकसान ; विखे यांच्याकडून पाहणी

पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. ३) एप्रिल सकाळच्या सुमारास संशयित आरोपी मयुर साळवे याने आपल्या मोबाईलवरून पोलीस हेल्पलाइन ‘डायल ११२’ वर दोन वेळा कॉल केला. या कॉलमध्ये त्याने “मुंबईचा नाश होणार आहे आणि मुंबईमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे” अशी धक्कादायक माहिती दिली. मुंबईसारख्या संवेदनशील शहराबाबत अशा प्रकारचा निनावी कॉल आल्याने पोलीस यंत्रणा तत्काळ सतर्क झाली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

हा कॉल हिवरे कोरडा गावातून आल्याचे निष्पन्न (Filed a Case)

घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, सहायक पोलीस निरीक्षक नितीन खंडागळे, गणेश डहाळे आणि अमोल धामणे यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करून संशयित आरोपीचा शोध सुरू केला. अवघ्या काही वेळातच हा कॉल पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा गावातून आल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तत्काळ पथक पाठवून मयुर साळवे याला ताब्यात घेतले.

आरोपीची कसून चौकशी

प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता, अहिल्यानगर येथील दहशतवादी विरोधी पथकाद्वारे आरोपीची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत त्याने केवळ खोटी अफवा पसरवण्यासाठी आणि पोलीस प्रशासनाला त्रास देण्यासाठी हे कृत्य केल्याचे समोर आले. त्याच्याकडे कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा घातपाताचा कट असल्याचे आढळून आले नाही, मात्र त्याच्या या कृतीमुळे सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विशाल अंबादास टकले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात आरोपी मयुर साळवे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अफवा पसरवून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली असून, पुढील तपास सहायक फौजदार जी. एन. डहाळे करत आहेत.