Film on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर चित्रपट येणार; गौतमी पाटील व अण्णा नाईक साकारणार महत्वाची भूमिका 

0
Film on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर चित्रपट येणार; गौतमी पाटील व अण्णा नाईक साकारणार महत्वाची भूमिका 
Film on Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेवर चित्रपट येणार; गौतमी पाटील व अण्णा नाईक साकारणार महत्वाची भूमिका 

नगर : महाराष्ट्र सरकारची लोकप्रिय योजना असलेल्या ‘लाडकी बहीण योजने’वर आधारित सिनेमा (Ladki bahin yojana Movie) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना दीड हजार रुपये असा आर्थिक लाभ देण्यात येतो. आता या योजनेवर सिनेमा येणार आहे. विशेष बाब म्हणजे नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil ) आणि रात्रीस खेळ चाले फेम अण्णा नाईक (Anna Naik) या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?;वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल  

लाडकी बहीण योजनेवर आधारित चित्रपटात गौतमी पाटील झळकणार (Film on Ladki Bahin Yojana)

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. आता या योजनेवर आधारित चित्रपटात  प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. तिच्या अभिनयाच्या जोडीला रात्रीस खेळ चाले फेम लोकप्रिय अभिनेते अण्णा नाईक यांची दमदार साथ असणार आहे. या दोघांची जोडी प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे. नुकताच सातारा येथे या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला.

अवश्य वाचा : विमानाबाहेरील ‘त्या’ ३३ मृतांच्या कुटुंबियांनाही मिळणार १ कोटी रुपयांची आर्थिक मदत

गणेश शिंदे करणार चित्रपटाचे दिग्दर्शन (Film on Ladki Bahin Yojana)

मराठी चित्रपटसृष्टीतून समाजाभिमुख विषयांना चालना देणाऱ्या सिनेमांची परंपरा आहे.अशाच एका महत्त्वाच्या विषयावर आधारित असलेला ‘लाडकी बहीण’ हा एक चित्रपट आहे. या चित्रपटाची निर्मिती ओम साई सिने फिल्म व शुभम फिल्म प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने केली जात आहे. शितल गणेश शिंदे, बाबासाहेब पाटील आणि अनिल वणवे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. तर  दिग्दर्शनाची जबाबदारी गणेश शिंदे यांनी सांभाळली आहे. चित्रपटाच्या पटकथा आणि संवाद लेखनाचे काम शितल शिंदे यांनी साकारले आहे

या वेळी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. यावेळी कराड दक्षिणचे आमदार अतुल भोसले, कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील आदी उपस्थित होते.