Santosh Deshmukh:अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

0
Santosh Deshmukh:अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!
Santosh Deshmukh:अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला (santosh deshmukh murder) तब्बल एक महिना उलटला आहे. त्यांच्या हत्येनंतर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मोर्चा काढण्यात येत होता. यानतंर आज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख (Dhananjay deshmukh) यांनी आक्रमक होत स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन(agitation) केले. जवळपास चार तास त्यांचे हे आंदोलन सुरु होते. यानंतर मनोज जरांगे पाटील आणि बीडचे एसपी यांनी संवाद साधल्यानंतर धनंजय देशमुखांनी आंदोलन मागे घेतले. पाण्याच्या टाकीवरुन उतरताच धनंजय देशमुखांनी मनोज जरांगेंना मिठी मारत जोरजोरात हंबरडा फोडला.

नक्की वाचा : ‘स ला ते स ला ना ते’चित्रपटाच्या टीजरचे नितीन गडकरी यांच्या हस्ते प्रकाशन  

यानंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, माझ्या भावाला ज्यांनी संपवलं. ज्यांनी कटकारस्थान केलं. त्यांना फाशी द्या, मला अस्वस्थ वाटतंय. उलट्या होत आहेत. मी काही वेळाने बोलतो,असेही त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा : मोठी बातमी!पंजाबमधील आप आमदाराचा गोळी लागून मृत्यू

बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी यांनी केली मध्यस्थी  (Santosh Deshmukh)

धनंजय देशमुख हे पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत असताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी त्यांचे आंदोलन सुरुच ठेवले. यानंतर बीडचे एसपी नवनीत कॉवत यांनी धनंजय देशमुख यांना आश्वासन दिले. मी एसआयटीचे अधिकाऱ्यांशी बोलणं करून देतो,  सं आश्वासन एसपी नवनीत कॉवत यांनी दिल्यानंतर धनंजय देशमुख हे टाकीवरुन खाली उतरले.याआधी प्रसारमाध्यमांशी बोलताना संतोष देशमुख यांची  मुलगी वैभवी देशमुख हिने संवाद साधला. यावेळी तिने आम्ही न्याय मागतो. रस्त्यावर आलो. शांततेत न्याय मागतो. तरीही आम्हाला न्याय का मिळत नाही, असा सवाल उपस्थित केला.

काय म्हणाली वैभवी देशमुख ? (Santosh Deshmukh)

माझ्या घरासमोर पोलिसांचा ताफा असताना माझा चाचा आंदोलन करतोय. मग पोलीस करतात काय? आज माझे पप्पा गेले, उद्या चाचाला गमावलं तर आम्ही काय करायचं? जसा चाचा वर गेलाय, आरोपींना अटक नाही झाली तर आम्ही टाकीवर जाऊ. आम्हाला काही झालं तर संपूर्ण पोलीस प्रशासन पुढचं बघून घेईल. आमचा एक माणूस गेला तरी पोलीस आरोपींना पकडत नाही. मग आमच्या कुटुंबातील सर्व जातील तेव्हा पोलिसांचे डोळे उघडतील, आरोपींना पकडतील,असे वैभवी देशमुख म्हणाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here