Financial Fraud : नगर : ठेवीदारांची कोट्यावधी रुपयांची आर्थिक फसवणूक (Financial Fraud) करणाऱ्या भाग्यलक्ष्मी मल्टीस्टेटच्या (Bhagyalaxmi Multistate) संचालकांवर तसेच एजंटवर कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (District Collector’s Office) आज (ता. १३) रोजी आंदोलन करण्यात आले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) गुन्हा दाखल असून एक वर्ष उलटूनही कुठलीच कारवाई झाली नाही. या घटनेतील आरोपी मोकाट फिरत आहेत. त्यांच्यावर एमपीडी आय अंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नक्की वाचा: मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
ठेवीदार मोठ्या संख्यने उपस्थित
यावेळी जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सतीश साठे, शिरीष कुलकर्णी, नरेंद्र आलेचेट्टी, रंगनाथ शिरसाठ, बाबासाहेब हरगुडे, रवींद्र साठे, संतोष कदम, गणेश करंजे, सचिन खंडागळे, संदीप उंडे, सतीश पुंड, दीपाली पिंपरकर, सविता वाबळे आदींसह ठेवीदार मोठ्या संख्यने उपस्थित होते.
अवश्य वाचा: “लाडक्या बहिणींना केवायसी करावीच लागेल”- अजित पवार
यावेळी ठेवीदार म्हणाले की, (Financial Fraud)
पोलीस प्रशासन दुपटी भूमिका घेत आहे. आरोपीना अटक अद्याप ही अटक केली जात नाही. संस्थेने कर्ज वाटप केली नाही. ठेवीदारांकडून गोळा केलेली रक्कम आरोपींकडे आहे. टी अपहार केलीली रक्कम कुठे आहे याचा शोध एकवर्ष उलटूनही पोलिसांनी घेतला नाही. फॉरेन्सिक ऑडीटचा अहवाल तयार करून सुद्धा पोलीस प्रशासनाने तो अहवाल न्यायालयात दाखल केला नाही. तो अहवाल तत्काळ न्यायालयात सादर करावा, अशी मागणी ठेवीदारांनी केली आहे.