Fire : श्रीगोंदा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) शाॅपीग सेंटरमधील श्री राम ऍग्रो कृषी सेवा केंद्र तसेच शेजारील कॉम्पुटर सेंटर मध्ये विजेचे शॉर्टसर्किट (short circuit) होऊन भीषण आग (Fire) लागल्याने औषधे, खते इतर साहित्य जळून खाक झाले. ही घटना बुधवारी (ता.२७) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी नवनाथ रसाळ यांनी श्रीगोंदा पोलीस (Police) ठाण्यात फिर्याद दिली.
अवश्य वाचा : श्रीगोंदेतून द्राक्ष व्यापाऱ्याचे अपहरण
रासायनिक खते व औषधांनी घेतला पेट
श्रीगोंदा बाजार समितीचे श्रीगोंदा काष्टी रोडवर असलेल्या दोन मजली शाॅपीग सेंटरमध्ये नवनाथ रसाळ यांचे कृषी सेवा केंद्र आहे. याच्या पाठीमागेच रासायनिक खते तसेच औषधांचे गोडाऊन आहे. बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास गोडाऊन मधे विजेचे शाॅटर्कीट होऊन गोडाऊन मधील रासायनिक खतानी तसेच औषधांनी पेट घेतला. या आगीत कृषी दुकानाच्या वरच्या मजल्यावर असलेल्या निखील गिरमकर यांचे काॅम्प्युटर सेंटर मधील कॉम्प्युटरचे मोठे नुकसान झाले. तसेच रत्नाकर कोंडीबा भुजबळ यांच्या ऑफिसमधील एसीला आगीची झळ लागून नुकसान झाले.
नक्की वाचा : प्रकाश आंबेडकरांचा मविआला धक्का; उमेदवारांची पहिली यादी जाहीर
२ कोटींचे नुकसान (Fire)
केमिकल युक्त औषधामुळे तसेच खतांमुळे आगीचा डोंब उसळत परिसरात धुराचे प्रचंड लोळ पसरले होते. श्रीगोंदा नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना ही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. आग आटोक्यात आणण्यासाठी सुमारे चार तासाचा अवधी लागला. यानंतर मालाची तपासणी केली असता सुमारे दोन कोटी पाच लाखाचे औषधे, खते इतर साहित्य जळून खाक झाल्याचे निदर्शनास आले.