Fire : हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू; राजकोटपाठोपाठ दिल्लीतही अग्नितांडव!

Fire : हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू; राजकोटपाठोपाठ दिल्लीतही अग्नितांडव!

0
Fire
Fire : हॉस्पिटलला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू; राजकोटपाठोपाठ दिल्लीतही अग्नितांडव!

Fire : नगर : गुजरातमधील राजकोटमध्ये शनिवारी संध्याकाळी एका गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत (Fire) तब्बल २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाल्याची माहिती समोर आली होती. तर दुसरीकडे राजधानी दिल्लीतही (Delhi) शनिवारी रात्रीच्या सुमारास भीषण आगीची घटना घडली. दिल्लीच्या विवेक विहार परिसरातील न्यू बॉर्न बेबी केअर सेंटरला लागलेल्या आगीत सात नवजात अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Fire
Fire

हे देखील वाचा : मोठी बातमी! दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर; कोकण विभाग सर्वात अव्वल

आगीचे कारण अद्याप अस्पस्ष्ट

पूर्व दिल्लीतील विवेक विहार भागात शनिवारी रात्री लहान मुलांच्या रुग्णालयात भीषण आग लागली. या दुर्घटनेत 7 नवजात बालकांचा जीव गेला. दिल्ली अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रात्री 11:32 वाजता त्यांना आग लागल्याची माहिती मिळाली. लागलीच अग्निशमन दलाच्या 9 गाड्या घटनास्थळी रवाना करण्यात आल्या. आग कशामुळे लागली हे कारण अजून समोर आलेले नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.

अवश्य वाचा : कोलकाताची तिसऱ्यांदा ‘आयपीएल’च्या जेतेपदावर मोहोर; हैदराबादला नमवले

या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त (Fire)

दरम्यान, या दुर्घटनेत सापडलेल्या पाच अर्भकांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. या आगीसाठी नेमकं काय कारण ठरलं, याचा शोध सध्या घेतला जात असून शॉर्ट सर्किटचं प्राथमिक कारण दिलं जात आहे. तसेच, रुग्णालयाला देण्यात आलेल्या परवानग्यांचीही चौकशी आता केली जात आहे.

ऑक्सिजन सिलेंडरच्या टाक्यांचाही स्फोट
या बेबी केअर सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन सिलेंडर्सचा साठा करण्यात आला होता. आगीची घटना घडली, तेव्हा या सिलेंडर्सपैकी अनेक सिलेंडर्स फुटल्याची माहिती अग्निशमन अधिकारी अतुल गर्ग यांनी दिली आहे. या घटनेत बेबी केअर सेंटरच्या बाजूच्या इमारतीमध्येही आग पसरली होती. मात्र, तिथे कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याचंही अग्निशमन विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Fire
Fire

राजकोटमध्ये गेमिंग झोनमधील आगीत २६ जणांचा मृत्यू
राजकोटमध्ये एका गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २६ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. रात्री उशीरापर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं. या प्रकरणात गेमिंग झोनचा मालक आणि तिथल्या मॅनेजरला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here