Fire : सुपा येथील कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे टायर आगीच्या भक्ष्यस्थानी

Fire : सुपा येथील कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे टायर आगीच्या भक्ष्यस्थानी

0
Fire : सुपा येथील कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे टायर आगीच्या भक्ष्यस्थानी
Fire : सुपा येथील कंपनीला भीषण आग; लाखो रुपयांचे टायर आगीच्या भक्ष्यस्थानी

Fire : पारनेर : तालुक्यातील सुपा औद्योगिक वसाहतीमधील (Supa Midc) एका कंपनीला लागलेल्या भीषण आगीत (Fire) लाखो रूपयांचे टायर जाळून (Burned) खाक झाले.

अवश्य वाचा : राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस;हवामान विभागाचा अंदाज

कंपनीत टायर असल्याने धारण आगीने केले रौद्ररूप

सुपा पारनेर रस्त्यालगत जांभूळवाडी वस्तीजवळ जुन्या औद्योगिक वसाहतीमध्ये आयुश अग्रवाल यांची व्हिजी कार्बन कंपनी आहे. या कंपनीत टायरपासून ऑईल तयार केले जाते. यामुळे कंपनीने मोठ्या प्रमाणात टायर ठेवले होते. विस्ताराने मोठ्या असलेल्या या कंपनीत गुरूवारी (ता.२६) पहाटे अचानक आग लागली. कंपनीत टायर असल्याने बघता बघता या आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, कंपनी परिसरात धूराचे लोटच्या लोट निर्माण झाले होते.

नक्की वाचा : शिर्डीत साईबाबा देवस्थानमध्ये पुन्हा बनावट पास विक्री,गुन्हा दाखल

आगीत लाखो रूपयांचे टायर जळाले (Fire)

कंपनीच्या मागील बाजूस लागलेल्या आगीत लाखो रूपयांचे टायर जळाले असून कंपनी प्रशासनाचे मोठे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलीस निरीक्षक अरुण आव्हाड आपला पोलीस फौजफाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. यावेळी नगर येथील अग्निशमनच्या गाड्या बोलाविण्यात आल्या. मात्र गाड्यांना येण्यास वेळ लागल्याने तोपर्यंत टायरने आणखी पेट घेतला. काही वेळाने अहिल्यानगर येथून दोन गाड्या दाखल झाल्यानंतर दोन गाड्या व चार ते पाच टॅंकरच्या मदतीने शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणण्यात आली. यादरम्यान जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, सकाळपासूनच औद्योगिक वसाहतीमध्ये धुराचे लोट दिसत असल्याने नागरिकांनी ते पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.