Fire : फर्निचर कारखान्याला आग; कोट्यावधीचा माल जळून खाक

Fire : फर्निचर कारखान्याला आग; कोट्यावधीचा माल जळून खाक

0
Fire : फर्निचर कारखान्याला आग; कोट्यावधीचा माल जळून खाक
Fire : फर्निचर कारखान्याला आग; कोट्यावधीचा माल जळून खाक

Fire : श्रीरामपूर : श्रीरामपूर एमआयडीसीत (MIDC) असणाऱ्या सिद्धीविनायक फर्निचर या कारखान्याला (Factory) काल (शुक्रवारी) सकाळी मोठी आग (Fire) लागल्याने या कारखान्यातील कोट्यावधी रुपयांचा माल जळून खाक झाला आहे. सुमारे ३ ते ४ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही आग आटोक्यात आली. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही. मात्र, शॉर्टसर्किट अथवा वेल्डींगमुळे ही आग लागली असावी, अशी घटनास्थळी चर्चा आहे. 

अवश्य वाचा : मुंबईतून अपहरण झालेल्या चिमुकल्याची श्रीरामपुरात सुटका

अधिक माहिती अशी की,

श्रीरामपूर एमआयडीसीत कैलास शिंदे यांचा सिद्धीविनायक फर्निचर कारखाना आहे. २० गुंठ्यात असलेल्या या कारखान्यात फर्निचर तयार केले जातात. त्यात सोफासेट, टेबल, कॉट, आदी साहित्य बनवले जाते. त्यासाठी लागणारे प्लायवूड, फोम तसेच लेदरचे कव्हर असा मोठ्या प्रमाणावर कच्चामाल या ठिकाणी होता. तसेच तयार फर्निचरही मोठ्या प्रमाणावर होते. काल (शुक्रवारी) नेहमीप्रमाणे ९ वाजता कारखाना सुरू होत असताना व कामगार येत असताना अचानकपणे या कारखान्याला आग लागली. 

नक्की वाचा : माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधणार;केंद्र सरकारचा निर्णय

आग विझविण्यासाठी अनेक ठिकाणच्या अग्निशामक गाड्या (Fire)


लाकडी साहित्य, फोम आणि लेदरचे साहित्य असल्याने आगीने मोठा पेट घेतला. आग लागल्यानंतर काही मिनिटांत आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे कळताच तातडीने अग्निशामक दलाच्या गाड्यांना बोलावण्यात आले. त्यात सुरूवातील श्रीरामपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे वाहन आले. त्यानंतर अशोक कारखाना तसेच देवळाली प्रवरा नगरपालिका, राहाता नगरपालिका, गणेश कारखाना, संजीवनी कारखाना आदी ठिकाणच्या अग्निशामक गाड्या आग विझविण्यासाठी त्या ठिकाणी आल्या.

सुमारे १० ते १५ गाड्यांनी या ठिकाणी या कारखान्याची आग विझवली जात होती. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याने शेवटी सिद्धार्थ मुरकुटे आणि एमआयडीसी कारखान्याचे बाबासाहेब काळे यांनी गोदावरी बायोरिफायनरी येथे फोन करून आग विझवण्यासाठीच्या धुराचे अग्निशमन वाहन पाचारण करण्यात आले. हे वाहन आल्यानंतर मात्र, आग जवळपास ८०-९० टक्के आटोक्यात आली. दुपारी १२.३० ते १ वाजता आग आटोक्यात आली होती. या आगीत कोट्यावधी रुपयांच्या साहित्य, मशिनरीचे नुकसान झाल्याचे समजते.