Fire : अकोले : तालुक्यातील तांभोळ येथील बाळासाहेब नवले यांच्या हॉटेल व किराणा दुकानाला शॉर्टसर्किटमुळे (Short Circuit) लागलेल्या आगीत (Fire) संपूर्ण दुकान जळून खाक झाले. त्यात त्यांचे सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
मुस्लिम भारताला युद्ध भूमी मानतात,त्यांना देशात ठेवूच नये असे स्वत:आंबेडकर म्हणालेत – गोपीचंद पडळकर
खिडकीची काच फुटल्याने घटना आली लक्षात
बाळासाहेब नवले व त्यांची पत्नी नंदा नवले हे गावातील चौकात किराणा व हॉटेल व्यवसाय करतात. ऐन दिवाळीच्या तोंडावर त्यांनी किराणा दुकानासाठी माल भरला होता. मध्यरात्री अचानक त्यांच्या दुकानाला आग लागली. दुकानाचे लगतच ते राहायला असल्यामुळे त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटल्याने त्यांच्या ही घटना लक्षात आली.
ग्रामपंचायतच्यावतीने शक्य ती मदत करण्याची ग्वाही (Fire)
या आगीत त्यांच्या दुकानातील सर्व माल व साहित्य जळून खाक झाले आहे. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. उपसरपंच सुदाम नवले, माजी सरपंच मंगेश कराळे, सुरेश दोरगे, प्रतिक नवले, सिद्धार्थ शिंदे, राजू मोहिते, विजय मोहिते आदींनी आग विझविण्यासाठी मदत केली. यामध्ये माजी सरपंच मंगेश कराळे हे जखमी झाले आहेत. त्यांचा हात यामध्ये भाजला आहे. घटनेची माहिती मिळताच आमदार डॉ. किरण लहामटे यांनी भेट देऊन पाहणी केली. सरपंच जयश्री माने यांनी सदर नवले कुटुंबीय यांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना ग्रामपंचायतच्यावतीने शक्य ती मदत करू अशी ग्वाही दिली. मात्र, प्रशासनाने नुकसानग्रस्त नवले कुटुंबियांना आर्थिक मदत करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या जळीत घटनेबद्दल तांभोळ व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गावातील अनेकांनी त्यांना मदतीचा हात दिला आहे.