Fire : पारनेर : पारनेर (Parner) तालुक्यातील घाणेगाव येथे आज दुपारी एक मोठी आणि धक्कादायक घटना घडली. श्री व्यंकटेश्वर कंपनीला अचानक भीषण आग (Fire) लागल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली हाेती.” घाणेगाव येथील श्री व्यंकटेश्वर कंपनीमध्ये अचानक आग लागल्याची माहिती समोर आली. आग इतकी भीषण होती की काही क्षणातच धुराचे मोठे लोट आकाशात दिसू लागले. परिसरातील नागरिकांनी तात्काळ अग्निशामक दलाला (Fire Department) माहिती दिली.
नक्की वाचा : श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
अग्निशामक दल आणि प्रशासनाच्या मदतीने आग नियंत्रणात
घटनेची माहिती मिळताच भाजप तालुका अध्यक्ष राहुल पाटील शिंदे आणि दत्ता नाना पवार यांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी प्रशासनाशी तात्काळ संपर्क साधत परिस्थितीची गंभीरता लक्षात आणून दिली. यावेळी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या हाेत्या. मात्र आग आटोक्यात आणण्यासाठी आणखी दोन अग्निशामक गाड्या मागवण्यात आल्या. अग्निशामक दल आणि प्रशासनाच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान (Fire)
या आगीत नेमके किती नुकसान झाले याचा अंदाज अद्याप लागलेला नाही. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती सध्या उपलब्ध नाही. मात्र कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून आग पूर्णपणे नियंत्रणात आल्यानंतरच नेमकी माहिती स्पष्ट होईल. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



