TamilNadu hospital Fire:तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू

0
TamilNadu hospital Fire:तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू
TamilNadu hospital Fire:तामिळनाडूतील खाजगी रुग्णालयाला आग;अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू

नगर : तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) एक दुर्दैवी घटना घडली आहे. येथील एका खाजगी रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत (Big Fire) एका अल्पवयीन मुलासह सहा जणांचा मृत्यू (Six people died) झाला आहे. ही घटना तामिळनाडूतील डिंडीगुल (Dindigul) जिल्ह्यात गुरुवारी (ता.१२) रात्री उशिरा घडली आहे.

नक्की वाचा : वक्फ बोर्डाला दहा कोटींचा निधी मंजूर,अल्पसंख्याक विभागाचा मोठा निर्णय  

तिरुची रोडवर असलेल्या रुग्णालयात लागली आग (TamilNadu hospital Fire)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास ही आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाकडून लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले. रुग्णालयातून शंभरपेक्षाही अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. मात्र, तोपर्यंत आग चांगलीच वाढली होती. जखमींना लगेचच दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात  आले. डिंडीगुल जिल्हातील तिरुची रोडवर असलेल्या रुग्णालयात ही आग लागली.

अवश्य वाचा : अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरावर ईडीचा छापा  

लीफ्टमध्ये श्वास गुदमरल्यानं सहा जणांचा मृत्यू  (TamilNadu hospital Fire)

तामिळनाडूमधील या दुर्घटनेनंतर हे सर्व सहा जण हे इमारतीच्या लिफ्टमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडल्याची माहिती पोलीस आणि अग्निशमन विभागाने दिली आहे. यानंतर त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आले, मात्र येथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. अग्निशमन विभागाकडून रुग्णालयात शोध आणि बचाव कार्य सुरू असताना या पीडितांचा लीफ्टमध्ये श्वास गुदमरल्यानं मृत्यू झाला होता.

बचाव पथकाकडून किमान ३० रूग्ण आणि डॉक्टरांना इमारतीमधून बाहेर काढण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर काढण्यात आलेल्या सर्वांना जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.रुग्णालयात लागलेली आग ही इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची शक्यता पोलिसांनी प्राथमिक तपासानंतर दिली आहे. दरम्यान या आगीच्या घटनेचा व्हिडीओ समोर आला अशी. यामध्ये रुग्णालयाच्या इमारतीतून आग आणि धूर निघताना दिसत आहे. आगीतील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश असल्याची देखील माहिती मिळाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here