Firing : नगर : शहरातील माळीवाडा वेशीपासून मार्केट यार्डकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका दुकानात काल (बुधवारी) गोळीबार (Firing) झाला होता. या प्रकरणी गोळीबाराचा बनाव करून तिसऱ्यालाच अडकवू पाहणाऱ्या सिराज दौलत खान याच्यासह तीन जणांना कोतवाली पोलिसांनी (Police) ताब्यात घेत अवैध शस्त्र (Illegal Weapon) बाळगणे व धमकावण्याचा गुन्हा दाखल (Filed a Case) केला आहे.
नक्की वाचा : नगर-मनमाड रस्त्यावरील वाहतुकीत बदल; आदेश जारी
पोलिसांकडून कसून तपास करण्यास सुरुवात
सिराज खान याच्या मालकीच्या दुकानात तो, डॉ. प्रदीपकुमार तुपेरे व राजेंद्र बहुधने हे बसले असताना काल सायंकाळी सव्वापाच वाजता गोळीबार झाला होता. या प्रकरणात कोतवाली पोलिसांनी राजेंद्र बहुधने याला ताब्यात घेतले होते. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. पोलिसांनी या प्रकरणी बहुधने, डॉ. तुपेरे व सिराज खान अशा तिघांचेही जबाब घेतले. मात्र, या जबाबामध्ये साम्य आढळून आले नाही. त्यामुळे पोलिसांनी अधिक कसून तपास करण्यास सुरुवात करताच वेगळीच गोष्ट समोर आली.
अवश्य वाचा : आरक्षणाचे खरे शत्रू काेण?; शरद पवारांचे नाव न घेता मंत्री विखेंची टीका
हवेत केला गोळीबार (Firing)
डॉ. तुपेरे यांच्या हॉस्पिटल समोरील जागेतील अतिक्रमण महापालिकेकडून काढण्यात आले होते. याला सिराज खानने डॉ. तुपेरे यांना जबाबदार धरत त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. सिराज खानने डॉ. तुपेरे यांना त्यांच्या हॉस्पिटलमधून तर बहुधने याला तारकपूर बसस्थानक परिसरातून आपल्या कारमध्ये बसवून माळीवाडा येथील दुकानात आणले. यावेळी सिराज खान याने त्याचा मुलगा मोईन खान याला पिस्तुल आणायला सांगितले. त्यानुसार तो पिस्तुल घेऊन आला. ही पिस्तुल मोईन खानने निसार नावाच्या व्यक्तीकडून लोड करून घेतली. तसेच हवेत गोळीबार केला. ही पिस्तुल बहुधने याच्या हातात देऊन पोलिसांना बहुधने यानेच गोळीबार केला आहे, असे सांगण्याची धमकी दिली. त्यानुसार डॉ. तुपेरे यांनी पोलिसांना बहुधने याने गोळीबार केल्याचे सांगितले. त्यानुसार बहुधनेला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, पोलीस तपासात सिराज खान यानेच गोळीबार केल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी बहुधने यांच्या फिर्यादीवरून सिराज खान, त्याचा मुलगा मोईन खान व निसार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.