Firing : जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

Firing : जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

0
Firing : जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी
Firing : जामखेड मधील हॉटेलमध्ये गोळीबार; हॉटेल मालक गंभीर जखमी

Firing : नगर : जामखेड शहरातील बीड रस्त्यावरील एका हॉटेलची तोडफोड करत गोळीबार (Firing) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत हॉटेल मालक गंभीर जखमी (Seriously Injured) झाला असून त्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. मात्र ही घटना जुन्या वादातून झाली असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

अवश्य वाचा: दहा दिवसांत बिबट्याचा बंदोबस्त करा, अन्यथा ‘पारनेर बंद’

याबाबत माहिती अशी की, (Firing)

बुधवारी मध्य रात्री हॉटेल मालक रोहीत अनिल पवार (वय २७) हा हॉटेलवर गिऱ्हाईक पहात होता. यावेळी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळीने हॉटेलवर येत हल्ला करून तोडफोड केली. तसेच रोहीत पवार यांच्यावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याच्या पायाला गोळी लागल्याने तो या गंभीर जखमी झाला. दरम्यान, या हल्ल्यात वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून, आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.

नक्की वाचा : महायुती म्हणून महापालिका लढवण्याचा प्रयत्न : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील