HMPV: एचएमपीव्ही व्हायरसने (HMPV Virus) सगळीकडे धुमाकूळ घातलेला असताना मुंबईत (Mumbai) याचा पहिला रुग्ण(First case) सापडला आहे. मुंबईच्या पवईमधील हिरानंदानी रुग्णालयात आज (ता.८) ह्युमन मेटाप्युमो व्हायरसचा म्हणजेच एचएमपीव्हीचा पहिला रूग्ण आढळून आला आहे. सहा महिन्यांच्या बाळाला याची लागण झाल्याचे चाचणीतून स्पष्ट झाले आहे. खोकला आणि ऑक्सिजनची पातळी ८४ टक्क्यांपर्यंत खाली घसरल्याने या बाळाला १ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
नक्की वाचा : डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार
पवईतील हिरानंदानी रुग्णालयात बाळावर उपचार सुरु (HMPV Found In Mumbai)
पवईतील हिरानंदानी रुग्णालयातील डॉक्टरांनी मंगळवारी दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूवर कोणतेही विशिष्ट उपचार नसल्यामुळे बाळावर आयसीयूमध्ये ब्रॉन्कोडायलेटर्सच्या लक्षणांवर उपचार सुरू करण्यात आले आहेत. त्यांनी स्थानिक प्रशासनाला १ जानेवारी रोजी एचएमपीव्ही रुग्णाबाबत कल्पना दिली होती. परंतु परळ येथील बीएमसीच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांना असा कोणताही अहवाल प्राप्त झालेला नाही.
अवश्य वाचा : एचएमपीव्ही व्हायरसपासून वाचण्यासाठी काय करावं आणि काय करू नये ?
चीनमध्ये सध्या एचएमपीव्हीचा उद्रेक सुरू असल्याने,देशातही या विषाणूला रोखण्यासाठी खबरदारी घेतली जात आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या नियमित तपासणी दरम्यान देशातील काहींना या विषाणूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोग्य मंत्रालयाने काही दिवसांपूर्वी चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी एक संयुक्त पाहणी पथकाची स्थापना केली आहे. हे पथक जागतिक आरोग्य संघटनेकडून वेळोवेळी चिनमधील परिस्थितीबद्दल माहिती घेत आहे.