First Day Of School : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

First Day Of School : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

0
First Day Of School : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत
First Day Of School : शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत

First Day Of School : नगर : शाळा प्रवेशोत्सव २०२५ कार्यक्रमांतर्गत जिल्हाभरातील जिल्हा परिषद (ZP) शाळेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या दिवशी (First Day Of School) लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी (Administrative Officer) विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना समग्र शिक्षाअंतर्गत मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, बुट, पायमोजे आदींचे वितरणही करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मान्यवरांनी केलेल्या स्वागताने विद्यार्थ्यांच्या (Student) चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसत होता.

नक्की वाचा : राज्य सरकारला लाडक्या वारकऱ्यांचा विसर पडला का ?; वारकर्‍यांचा सरकारला संतप्त सवाल

राजकीय नेत्यांकडूनही विद्यार्थ्यांचे स्वागत

जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखलपात्र ५९ हजार ५२७ विद्यार्थ्यांपैकी ३५ हजार ३०९ विद्यार्थी तर इतर व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये १९ हजार २१७ शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी दाखल झाले. खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी राहाता येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. हंगा येथील शाळेमध्ये खासदार निलेश लंके यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. शेवगाव तालुक्यातील वरुर येथील शाळेत आमदार मोनीका राजळे यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार किरण लहामटे यांनी अकोले तालुक्यातील कातळापूर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर व राहुरी येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार विठ्ठलराव लंघे यांनी नेवासा तालुक्यातील गेवराई येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार काशिनाथ दाते यांनी टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. आमदार विक्रम पाचपुते यांनी श्रीगोंदा येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले.

अवश्य वाचा : पोलिसाकडून स्वस्तात प्लॉट देण्याच्या नावाखाली आर्थिक फसवणूक

सनदी अधिकाऱ्यांनी केले विद्यार्थ्यांचे स्वागत (First Day Of School)

जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी अहिल्यानगर तालुक्यातील निंबोडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. यावेळी डॉ. आशिया यांच्या हस्ते ‘इन्फोसिस स्प्रीनबोर्ड‌- मेकर लॅब ऑन व्हील्स’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी भोरवाडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले तर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी बुऱ्हाणनगर येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले.या स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाचे भाव दिसत होते.