First Day Of Schools : नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागताने गजबजला शाळेचा परिसर

First Day Of Schools : नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागताने गजबजला शाळेचा परिसर

0
First Day Of Schools : नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागताने गजबजला शाळेचा परिसर
First Day Of Schools : नूतन विद्यार्थ्यांच्या स्वागताने गजबजला शाळेचा परिसर

First Day Of Schools : कर्जत : शाळेच्या प्रवेशद्वारावर ढोल-ताशाचा गजर, आकर्षक रांगोळी, फुलांच्या माळा, फुग्याची आरास, शाळेच्या सर्व शिक्षकांच्या (Teacher) हाती गुलाबपुष्प, कुणाचा शाळेचा पहिला दिवस (First Day Of Schools) त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी तर कुठे नवीन वर्ग, नवे वर्गशिक्षक मिळण्याची आस यामध्ये शाळेचा (School) पहिला दिवस मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.

नक्की वाचा : पंकजा मुंडे यांचे पुनर्वसन करण्याची मागणी

सर्वच शाळा-विद्यालयाने विद्यार्थी स्वागताची जय्यत तयारी

चालू शैक्षणिक वर्षातील १५ जून शाळेचा पहिला दिवस आनंदात गेल्याचे समाधान विद्यार्थी वर्गात पहावयास मिळाले. उन्हाळ्याच्या दीर्घ सुट्टीनंतर नवीन शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवसाची सर्वच शाळा-विद्यालयाने विद्यार्थी स्वागताची मोठी जय्यत तयारी केली होती. नवीन प्रवेशाचे स्वागतासाठी शिक्षकांनी ढोल-ताशा यासह फुलांचा वर्षाव यात नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत कर्जत तालुक्यात करण्यात आले.

अवश्य वाचा : ‘नेत्याला पक्षात घेऊन संपवणं ही भाजपची परंपरा’- विजय वडेट्टीवार

कुठे उत्साहात तर कुठे रडत-खडत शाळेत (First Day Of Schools)

नवीन विद्यार्थी कुठे उत्साहात तर कुठे रडत-खडत शाळेत येताना दिसत होते. नवीन वर्ग, नवे मित्र मिळण्याचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. तर पालकांच्या विरहाने अनेकांना रडू कोसळत होते. नवीन दफ्तर, पाण्याची वॉटरबॅग, आकर्षक पृष्ठभाग असलेल्या वह्या, कंपास विद्यार्थी एकमेकांना दाखवत होते. शाळेने सजावट केलेल्या आकर्षक सेल्फी पॉईंटवर नूतन विद्यार्थ्यांना फोटो घेण्याचा मोह आवरला नाही. यावेळी अनेक शाळांत स्थानिक शालेय समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते मुलांना पाठयपुस्तके प्रदान करण्यात आले. शेवटी मध्यान्ह सुट्टीत गोड मिष्टान्न विद्यार्थ्यांना देण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here