Manoj jarange:’आधी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा,मग निवडणुका जाहीर करा’- मनोज जरांगे

आधी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा,सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही,असा इशारा मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी दिलाय.

0
Manoj Jarange
Manoj Jarange

नगर : आधी मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न मार्गी लावा,सगेसोयरेची अंमलबजावणी करा, मग निवडणुका जाहीर करा, अन्यथा मराठा समाजाची लाट सरकारला परवडणार नाही,असा इशारा मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी दिलाय. आज लोकसभेच्या निवडणुकांचा (Loksabha Election) कार्यक्रम जाहीर होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये किती टप्प्यात, कोणत्या तारखेला मतदान होणार याबाबतची माहिती मिळणार आहे. दरम्यान, निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला हा इशारा दिला आहे.

नक्की वाचा : मोठी बातमी! राज्यातील शालेय शिक्षकांना आता ड्रेस कोड अनिवार्य

सत्ताधाऱ्यांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही – मनोज जरांगे (Manoj jarange)

सगेसोयरेची अंमलबजावणी न करता निवडणूक कार्यक्रम जाहीर करु नका, असे जरांगे पाटील म्हणालेत. सरकारला आधी सावध करणार नाही, आचारसंहिता लागू झाल्यानंतर आमची भूमिका मांडणार असल्याचे जरांगे म्हणालेत. सत्ताधारांच्या अंगाला गुलाल लागू देणार नाही. यांचा जीव सत्तेत आहे. त्यामुळं त्यांना सत्ताच मिळू देणार नाही,  मराठा समाज टोकाचा निर्णय घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अवश्य वाचा : अभिनेत्री स्मिता तांबेची प्रमुख भूमिका असलेला ‘कासरा’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

९०० एकरमध्ये सभा घेणार – मनोज जरांगे (Manoj jarange)

ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण न देता आचारसंहिता लागू केली, तर मराठा समाजाची सभा घेणार आहे. निवडणूक लागताच सभेची तारीख जाहीर करणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले. निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेआधी जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मोठी घोषणा केली. ९०० एकरमध्ये ६ कोटी समाज बांधवांची सभा घेणार आहे. मुंबई,  पुण्यासह अमरावती, सोलापूर, बीड, उस्मानाबाद अशा ११ ठिकाणच्या जागांचा पर्याय आहे. यापैकी एक जागा अंतिम करणार असल्याचं जरांगेंनी सांगितले.

‘आचारसंहिता लागू होण्याआधी सरकारने सगेसोयरेची अंमलबजावणी करावी’ (Manoj jarange)

आचारसंहिता लागू होण्याआधी राज्य सरकारनं सगेसोयरेच्या अंमलबजावणीची घोषणा करावी, अन्यथा निवडणूक पुढे ढकलावी असे जरांगे पाटील म्हणाले. मराठा समाजाच्या आरक्षणाचा ज्वलंत प्रश्न असताना सरकार आचारसंहिता कशी लावणार ? असा सवाल जरांगे पाटील यांनी सरकारला केला. मराठा समाजाला डावलून, त्यांचा अवमान करुन सरकारनं आचारसंहिता लागू करु नये असे जरांगे पाटील म्हणाले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समाजावर अन्याय करणार नाही याची आशा आहे. ओबीसी मधून सरकारनं आरक्षण दिलं तर मराठा समाज सत्ताधाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचणार, अन्यथा सत्ता मिळू देणार नाही असे जरांगे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here