नगर : राज्यात विधानसभा निवडणूक (Vidhansabha) जाहीर झाल्यानंतर आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी नाकाबंदी करत वाहनांची तपासणी केली जात आहे. यातच पुण्यातील खेड-शिवापूर (khed-shivapur) परिसरात नाकाबंदी दरम्यान एका खासगी वाहनातून पाच कोटी रुपयांची रक्कम (Five crore rupees) पोलिसांनी जप्त केली आहे. या घटनेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी एक्स या मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट करत सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नक्की वाचा : दहावीच्या परीक्षेत बदल;गणित,विज्ञानात २० गुण मिळाले तरी होणार पास
रोहित पवारांच्या पोस्टमध्ये नेमकं काय ?(Rohit Pawar)
रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, “सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांना निवडणुकीसाठी पहिली इंस्टॉलमेंट म्हणून २५-२५ कोटी दिले गेले असल्याची चर्चा असून काल यातलीच एक गाडी खेड-शिवापूरच्या डोंगार झाडीमध्ये पकडली गेली. एक गाडी सापडली पण अजून चार गाड्या कुठे आहेत? लोकसभेलाही सत्ताधाऱ्यांनी पाण्यासारखा पैसा ओतून महाराष्ट्राच्या जनतेला विकत घेण्याचा प्रयत्न केला. परंतु इथल्या स्वाभिमानी जनतेने महायुतीला कात्रजचा घाट दाखवला. विधानसभेलाही दलालीतून आलेल्या पैशाच्या जोरावर रात्रीस खेळ करण्याचा महायुतीचा कानमंत्र असला तरी महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्या खोकेबाजांना इथली जनता ok करुन डोंगर दऱ्या बघण्यासाठी पर्मनंट घरी पाठवणार, हे नक्की आहे. कारण ‘महाराष्ट्र आहे, गुजरात नाही’ हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावं”,असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.
अवश्य वाचा : ‘होऊ दे धिंगाणा’चं तिसरं पर्व लवकरच होणार सुरु,सिद्धार्थ जाधव घालणार धिंगाणा
माध्यमांशी बोलताना रोहित पवार काय म्हणाले ? (Rohit Pawar)
रोहित पवार म्हणाले की,“पुण्यातील खेड-शिवापूर परिसरात ५ कोटींची रोख रक्कम पोलिसांकडून जप्त करण्यात आली. ते पैसे सत्ताधारी आमदारांचे असल्याची चर्चा आहे. खेड शिवापूरच्या डोंगरामध्ये आणि झाडांमध्ये ते पैसे पोलिसांना सापडले आहेत. महायुतीने लोकसभेमध्ये पाण्यासारखा पैसा वाटला. आता विधानसभेला महायुतीचे आमदार त्यामध्ये भाजपाचे आमदार असूद्या की शिंदेंच्या शिवसेनेचे किंवा अजित पवारांच्या पक्षाचे आमदार असूद्या. कमीत कमी ५० कोटी रुपये खर्च केला जाईल, अशी चर्चा आहे. आता महायुतीच्या नेत्यांनी मलिदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात खाल्ला आहे, त्यातून काही हिस्सा निवडणुकीत ते वाटणार आहेत”, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला आहे. तसेच अनेक जण आमच्या सोबत येत आहेत. जागावाटप आज संध्याकाळपर्यंत जाहीर होईल . चर्चा सकारात्मक झाली आहे. जागेच्या वादाचा जो आकडा येतोय तो कमी आहे, असे रोहित पवार म्हणाले.