Tarkarli Beach:तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले;दोघांचा मृत्यू

0
Tarkarli Beach:तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले;दोघांचा मृत्यू
Tarkarli Beach:तारकर्ली समुद्रात पाच पर्यटक बुडाले;दोघांचा मृत्यू

Tarkarli Beach : कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनार्‍यावर (Tarkarli Beach) एक दुर्दैवी घटना घडली आहे. पुण्यातील (Pune) पाच पर्यटक या बीचवर आंघोळीसाठी समुद्रात उतरले होते. या पाच पैकी तीन पर्यटक खोल समुद्रात गेले असता दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू (Two tourists drowned) झाला आहे. तर दोघेजण बचावले असून एक जण गंभीर आहे. या दोघांचे मृतदेह स्थानिकांनी बाहेर काढत ग्रामीण रुग्णालयात नेले आहेत. खोल समुद्रात जाऊ नये,असे येथील नागरिकांनी सांगून देखील पर्यटक खोल समुद्रात गेल्याने ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे.  

नक्की वाचा : राज्यात उन्हाच्या झळा तीव्र होणार;’या’ठिकाणी पाऊस बरसणार  

खोल समुद्रात गेल्याने पर्यटकांचा मृत्यू (Tarkarli Beach)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,आज शनिवारी (ता.२२) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पुण्यातील काही पर्यटक तारकर्ली समुद्र किनार्‍यावर अंघोळीसाठी आले होते. त्याच दरम्यान पाच पर्यटकांपैकी तीन पर्यटक अंघोळीसाठी खोल समुद्रात गेले होते. स्थानिकांनी त्यांना खोल समुद्रात जाऊ नये,असे सांगितले होते. तरी देखील हे पर्यटक खोल समुद्रात आंघोळीसाठी गेले. यानंतर पर्यटक पाण्यात बुडत होते. तेव्हा स्थानिक नागरिकांनी या पर्यटकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. मालवण पोलिस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी आम्ही सुखरुप असलेल्यांकडे चौकशी करत असल्याचे सांगितले.

अवश्य वाचा : भगवद् गीतेवर हात ठेवून काश पटेल यांनी घेतली एफबीआयच्या संचालक पदाची शपथ  

एका पर्यटकाला वाचवण्यात स्थानिकांना यश (Tarkarli Beach)

तीनपैकी एका पर्यटकाला वाचवण्यात स्थानिक नागरिकांना यश आले आहे.तर दोन जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.दरम्यान या समुद्र किनार्‍यावर वारंवार अशा दुर्घटना घडत असतात. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. शुभम सुशील सोनवणे (हडपसर, पुणे), रोहित बाळासाहेब कोळी (हडपसर, पुणे) हे मयत झालेले असून ओंकार रामचंद्र भोसले (पुणे) याची प्रकृती गंभीर आहे. त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग येथे दाखल करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here