Flood : पारनेर : पारनेर (Parner) तालुक्यात एक दिवस विश्रांतीनंतर आज (मंगळवारी) पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली. ढगफुटी सदृश्य पावसाने ओढे नाले ओसंडून (Flood) वाहू लागले. तर शेतकऱ्यांच्या शेतात मुसळधार पाऊस पडल्याने माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले.
नक्की वाचा : हिंदू धर्मात प्रवेश केलेला शिवराम आर्य पुन्हा मुस्लिम धर्म स्वीकारणार; आर्थिक अडचणीमुळे निर्णय
पारनेर शहरात अनेकांच्या घरात पाणी (Flood)
यंदाच्या वर्षी उन्हाळ्यात प्रचंड उष्णता जाणवत होता. उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअस वर चढल्याने नागरिकांना प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागला. मे महिन्यात २४ तारखेला लागलेले नक्षत्र कोरडे गेल्यानंतर जून महिन्यात शनिवारी (ता.८) व रविवारी (ता. ९) तारखेला पावसाचे आगमन झाले. सोमवारी एका दिवसाच्या विश्रांतीनंतर मंगळवारी (ता. ११) पुन्हा सकाळी ढग दाटून आले होते. वातावरणात प्रचंड उष्णता जाणवत होती दुपारी चार नंतर अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसाने पारनेर शहरात अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने अनेकांनी नगरपंचायतीच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
अवश्य वाचा : माळशेज घाटात कोसळली दरड;संगमनेर तालुक्यातील दोघांचा मृत्यू
ढगफुटी सदृश्य पावसाने हंगा नदीला मोठ्या प्रमाणात पाणी (Flood)
सुपा शहरात मुसळधार पाऊस झाल्याने संपूर्ण शहर जलमय झाले. बाजारतळ व सुपा बसस्थानकात पाणी आल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. नगर – पुणे महामार्गावर चालकांना वाहने काढतांना मोठी कसरत करावी लागली. तर वाळवणे रस्त्यावर पूल झाल्यानंतर प्रथमच जोरदार पाऊस झाल्याने वाहतुकीला अडथळा न होता नागरिकांना ये – जा करता आल्याने समाधान व्यक्त केले. तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसाने हंगा नदीला गेली चार ते पाच वर्षांत प्रथमच मोठ्या प्रमाणात पाणी आले. तर मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पाणी साठल्याने रस्त्याची दुरवस्था झाली.
दरम्यान, चालू वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यातच पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पेरणीपूर्व मशागती शेतकऱ्यांनी पुर्ण केल्या. महागडे बी बियाणे खरेदी केली आहेत. वापसा होताच खरीप हंगामातील मूग, बाजरी, वाटाणा, तूर, जनावरांसाठी मका, कडवळ, घास आदींची पेरणी व सोगणी करण्यात येणार आहे. तर पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न सुटणार असल्याने शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.